Goa Beach Shacks : शॅक्स उभारण्यास परवानगी द्या; केरीवासीयांची मागणी

परवाने न देण्याच्या निर्णयामुळे व्यावसायिकांत खळबळ
Beach shack
Beach shackDainik Gomantak

Goa Beach Shacks : केरी किनारी भागात संरक्षक भिंतीचे काम अर्धवट असल्याची सबब पुढे करून जलस्त्रोत खात्याने पर्यटन खात्याला पत्राद्वारे शॅक्स उभारणीस परवानगी देऊ नये, असे कळवले आहे. या पत्रामुळे मंत्रिमंडळाने केरी किनाऱ्यावर यंदाच्या पर्यटन हंगामात शॅक्सना परवाने न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणलेले आहे.

व्यावसायिकांनी पाच ते दहा लाखांपर्यंत खर्च करून व्यवसाय थाटण्यासाठी साहित्य खरेदी केले आहे. आणि अचानक यंदा जर शॅक्स परवाने मिळाले नाही, तर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येईल,या भीतीपोटी सरकारने फेरविचार करून यंदा किनाऱ्यावर शॅक्स उभारण्यास परवाने द्यावेत, अशी मागणी व्यावसायिकांसह सरपंच धरती नागोजी यांनीही केली.

स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी आपण सरकारकडे चर्चा करून त्यामधून सुवर्ण मध्य गाठणार असल्याचे सांगितले.

Beach shack
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर दर 15 किमीवर सुविधा केंद्र, कोणत्या सुविधा मिळणार?

केरी किनाऱ्याची धूप ‘शॅक्स’मुळे नव्हे !

जलस्त्रोत खाते अंतर्गत आतापर्यंत २२ कोटी रुपये खर्चून केरी आजोबा मंदिर ते केरी फेरी धक्क्यापर्यंत संरक्षक भिंत उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे . ही भिंत सध्या पांढरा हत्ती बनत चालली आहे.

या भिंतीमुळे काही प्रमाणात किनाऱ्याला सुरक्षा मिळाली असली, तरी मात्र समुद्रकिनारा नष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे. सुरु बनांना संरक्षण मिळाले. मात्र किनाऱ्याची झालेली धूप, मात्र या संरक्षक भिंतीला रोखता आली नाही.

शॅक्स व्यवसायामुळे या किनाऱ्याची धूप झाली नाही, तर केरी तेरेखोल या नदीत रेती उपसा चालू आहे. तो थांबवला तरच केली किनाऱ्याला संरक्षण मिळेल,असे शॅक्स व्यावसायिकांनी सांगितले.

"किनाऱ्याची धूप ही वाळू उत्खननामुळे होत आहे. वाळू उपसा पूर्णपणे बंद करून शॅक्स व्यावसायिकांना परवाने देण्याची गरज आहे. आम्ही दहा दहा लाख रुपये खर्च करून साहित्य आणलेले आहे. आणि अचानक जर आम्हाला शॅक्स व्यवसाय थाटता येणार नाही,असे सांगितले तर आम्ही जगायचे कसे?"

-योगेश तळकर, शॅक्स व्यावसायिक

Beach shack
Margao Fish Market: मडगाव घाऊक मासळी बाजाराच्या अस्वच्छ स्थितीवर न्यायालयाने ओढले ताशेरे; दिले 'हे' निर्देश

स्थानिकांना रोजगार द्यावा !

"शॅक्स पॉलिसी वेगळी आणि शॅक्स परवाने देणे हा विषय वेगळा आहे. केरी किनाऱ्यावर भिंत बांधायची असल्याने यंदा सरकारने तिथे परवाने देण्यास हरकत घेतली आहे. तरीही आपण मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खवटे यांच्याशी चर्चा करून हा विषय सोडवणार आहे. स्थानिकांना शॅक्स व्यवसाय थाटण्यास परवानगी मिळवून देण्यास आपले प्रयत्न असतील."

जीत आरोलकर, आमदार

"दरवर्षी किनाऱ्यावर स्थानिक युवकांना बेरोजगारांना पर्यटन हंगामात शॅक्स व्यवसाय थाटण्यासाठी परवाने दिले जातात. सरकारने फेरविचार करून यंदाही त्या ठिकाणी परवाने द्यावेत. सरकारला जर संरक्षक भिंत उभारायची असेल तर अगोदर स्थानिक युवकांना, व्यावसायिकांना विश्वासात घेऊन मगच उभारायला हवी."

धरती नागोजी, सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com