Bank Robbery: केरी-सत्तरी स्टेट बँकेत चोरी; शाखा व्यवस्थापकसह दोघे ताब्यात

गुंतवणूकदारांची सकाळपासूनच बँकेच्या दारात गर्दी
Bank Robbery
Bank RobberyDainik Gomantak

वाळपई: केरी-सत्तरी येथे कार्यरत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला असला तरी अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र शाखा व्यवस्थापक व सहव्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीचा हा प्रकार काल मंगळवारी रात्री घडल्‍याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्‍यान, या प्रकारामुळे गुंतवणूकदारांमध्‍ये खळबळ माजली आहे. पण किती रुपयांची चोरी झाली हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

(Keri Sattari state bank robbery branch manager and two arrested by the police)

Bank Robbery
Goa Politics: 1 वरून 21! काँग्रेस आमदारांच्या बंडानंतर आरजीने विधानसभेसाठी कंबर कसली

मिळालेल्‍या माहितीनुसार, चोरीचा प्रकार आज सकाळी शाखा उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यामुळे उघडकीस आला. माहिती मिळताच वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र आज बुधवारी रात्री उशिरापर्यंत चोरीला नेमके काय गेले, किती रुपयांची रोकड पळविण्‍यात आली, याबाबत काहीच समजले नाही. चोरीचा प्रकार उघडकीस आल्‍यापासून आज दिवसभरात या शाखेचा दरवाजा उघडलेला नाही. त्‍यामुळे खातेधारकांमध्येही खळबळ माजली आहे. कारण या शाखेत अनेकांचे सुवर्णलकांर व मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत.

Bank Robbery
पणजीतील 'Santa Monica' जेट्टीजवळ आढळला तरंगता मृतदेह

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केरी येथे येऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस तपास सुरू असल्यामुळे त्यांनाही सविस्तर माहिती उपलब्ध झाली नाही. शाखेत असलेल्‍या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून या प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकतो. जोपर्यंत शाखेचा प्रमुख दरवाजा उघडत नाही, तोपर्यंत सध्‍या तरी काही समजणे कठीण बनले आहे.

गुंतवणूकदारांची सकाळपासूनच गर्दी

केरी-सत्तरी भागात ही एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. यामुळे अनेक सरकारी अधिकारी व निवृत्त कर्मचारी तसेच अन्‍य कामकारांचे वेतन याच बँकेत येत असते. त्‍यामुळे या बँकेशी अनेक ग्राहक जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी आपले महत्त्वाचे दस्तऐवज व सुवर्णलंकार सुरक्षित कपाटामध्ये ठेवलेले आहेत.

सध्या हा चोरीचा प्रकार घडल्यामुळे निश्चित काय घडले या संदर्भाची माहिती मिळालेली नाही. यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे. आज सकाळपासूनच लोकांनी बँकेच्‍या बाहेर गर्दी केली होती. दरम्‍यान, याबाबत फोनवरून पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्‍यांनी तो घेतला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com