...अन्यथा केरी वासीय विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार
येत्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही मागण्या पूर्ण न झाल्यास केरी (Kerry) वासीयांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर (Assembly elections) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला Dainik Gomantak

...अन्यथा केरी वासीय विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

हा वाडा खोतीगाव अभयारण्य कक्षेत येत असल्याने येथील रस्ता,वीज यांसारख्या सर्वच विकास कामांना वनखात्याची आडकाठी आहे. त्या वाड्याचे पूर्नवसन करण्यासही वनखाते पुढाकार घेत नाही.

काणकोण: काणकोण तालुक्यातील खोतीगाव पंचायत क्षेत्रातील केरी हा दुर्गम डोंगर माथ्यावर वसलेला वाडा, या वाड्यावर जाण्यासाठी किमान दीड मीटर रुंदीची वाट तयार करून देण्याची मागणी गोवा मुक्ती पासून येथील रहिवासी करीत आहेत. वीजही नाही अशा परिस्थितीत येथील रहिवासी जीवन कंठीत आहे. येत्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही मागण्या पूर्ण न झाल्यास केरी (Kerry) वासीयांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर (Assembly elections) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही मागण्या पूर्ण न झाल्यास  केरी (Kerry) वासीयांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर (Assembly elections) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला
गोवा आर्ट अँड कल्चर विभागाचा निकाल जाहीर

हा वाडा खोतीगाव अभयारण्य कक्षेत येत असल्याने येथील रस्ता,वीज यांसारख्या सर्वच विकास कामांना वनखात्याची आडकाठी आहे. त्या वाड्याचे पूर्नवसन करण्यासही वनखाते पुढाकार घेत नाही खोतीगाव अभयारण्याची निर्मिती 1985 साली त्या दिवसापासून येथील रहिवांशाना खऱ्या अर्थाने वनवास सोसावा लागत आहे.

येथील रहिवाशांच्या अनेक पिढ्या निसर्ग व पर्यावरणाशी साधर्म्य राखून जीवन जगले त्यानाच वनखात्याच्या जाचक नियमांमुळे जीवन असह्य झाले आहे.रस्ता वीज यासारख्या सोयी नसल्याने येथील मुलांना वसतीगृह,नातलग यांच्या घरी वयाच्या पाचव्या वर्षापासून राहून शिक्षण घ्यावे लागत आहे. येथील रहिवाशांना जवळचा डांबरी रस्ता म्हणजे सांगे तालुक्यातील साळजीणी किंवा खोतीगाव पंचायत क्षेत्रातील येडा त्यासाठी येडा ते नडके पर्यतचा चार किलोमीटर लांबीचा कच्चा रस्ता तुडवत व ओहळ नाले पार करत नडके वाडा गाठावा लागतो त्यानंतर खाचगळग्यानी भरलेल्या वाटेने डोंगर पार करत केरी वाड्यावर यावे लागते समुद्र सपाटीपासून हा वाडा आठशे मीटर उंचावर आहे.आजारी व गरोदर महिलांना इस्पितळात नेण्यासाठी खूर्चीला दांडे बांधून पाळणा करून दहा बारा किलोमीटर अंतर कापून येडा येथे आणावे लागते अशी कैफीयत येथील एक युवक गणेश लक्ष्मण वेळीप यांनी मांडली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com