केरी-तेरेखोल फेरीबोटीच्या पोलिसांसाठी पाच फेऱ्या

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

या सेवेदरम्यान जर तेरेखोलचा कोणी व्यक्त जर जाणार किंवा येणार असेल, तर त्याला ओळखपत्र दाखवूनच फेरीत घेतले जाणार आहे.

पणजी, 

नदी परिवहन खात्यातर्फे सुरू असलेल्या १८ जलमार्गांवरील दिवसभर चालणाऱ्या २८ फेऱ्यांपैकी केरी-तेरेखोल ही फेरीबोट सेवा केवळ पोलिसांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु केवळ तेरेखोलमधील लोकांना या फेरीबोटमधून ये-जा करता येणार आहे. लोकांचे ओळखपत्र बघूनच फेरीत घेतले जाणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गोवा सरकारने हे पाऊल उचलले आहे.
नदी परिवहन खात्यातर्फे राज्यातील १८ जलमार्गांवर फेरीबोट सेवा सुरू आहेत. टाळेबंदी शिथिल केल्यामुळे सध्या सर्व फेरीबोट सेवा सुरू आहेत. रविवारी पणजी ते बेती ही फेरीबोटसेवा बंद ठेवण्यात येत आहे. तर केरी-तेरेखोल ही फेरोबोट पोलिसांसाठी पाच फेऱ्या मारणार आहे. या सेवेसाठी सकाळी ८, ९, सायंकाळी ५, ८ आणि ९ वाजता फेरी उपलब्ध ठेवली आहे. या सेवेदरम्यान जर तेरेखोलचा कोणी व्यक्त जर जाणार किंवा येणार असेल, तर त्याला ओळखपत्र दाखवूनच फेरीत घेतले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने आणि काही लोक या मार्गाने राज्यात येऊ शकतात म्हणून आमदार दयानंद सोपटे यांनी याबाबत काळजी घेत, खात्याला ही फेरीबोट सेवा बंद ठेवण्याची सूचना केली होती. परंतु पोलिसांची ड्युटीची वेळ पाहता दिवसातून पाच फेऱ्या फेरीबोट करेल, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर सोळा मार्गांवर रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या फेरींची सेवा कमी केली आहे. रात्री आठ ते नऊ या वेळेत फेरीबोटसेवा बंद केली जात असून, लोक अजूनही सामाजिक अंतर पाळत नसल्याबद्दल खात्याच्या अधिकाऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या