Khandepar River Issue: जनसुनावणी वेळी खांडेपारवासीय आक्रमक म्हणाले, "महापूरानंतरची आमची स्थिती आम्हालाच माहित, बंधारा बांधून आणखी..."

पोलिस बंदोबस्त : सोनारबाग-उसगाव, मुर्डी-खांडेपारवासीयांचा विरोध
Public Hearing
Public HearingDainik Gomantak

Khandepar River Issue: खांडेपार नदीवर बंधारा बांधण्यास सोनारबाग-उसगाव आणि मुर्डी-खांडेपार या दोन्ही गावांतील लोकांनी तीव्र विरोध केला असून या बंधारा बांधकामासाठी जलस्रोत खात्याने रविवारी उसगाव व खांडेपार या दोन ठिकाणी जनसुनावणी घेतली.

यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा भडिमार करून त्यांना निरूत्तर केले. बंधारा बांधून पुराचा धोका पत्करायचा नाही, असे ग्रामस्थांनी ठणकावले. त्यामुळे जनसुनावणी आटोपती घ्यावी लागली.

खांडेपार येथील सभागृहात झालेल्या जनसुनावणीला स्थानिक ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमी, आरटीआय कार्यकर्ते, कुर्टी - खांडेपारचे पंच सदस्य उपस्थित होते. कुर्टी - खांडेपारच्या सरपंच संजना नाईक, उपसरपंच विल्मा परेरा, पंच अभिजीत गावडे यांच्यासह इतर पंचसदस्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.

जीवनदायिनी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला का वळवू दिले, असा सवाल करीत कोणत्याही परिस्थितीत खांडेपार नदीवर बंधारा नकोच, अशी भूमिका आज सोनारबागवासीयांनी घेतली. लोकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने अखेर ही सभा पोलिस बंदोबस्तात आटोपली.

मागच्या वेळेला खांडेपार नदीला महापूर आल्यानंतर आमची काय स्थिती झाली ती आम्हालाच ठाऊक आहे, अशा स्थितीत बंधारा बांधून आणखी धोका पत्करायचा नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले आणि सरकारी अधिकारी निरूत्तर झाले.

सोनारबाग रहिवाशांची आज सकाळी उसगाव पंचायत सभागृहात विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी जलस्रोत खात्याचे अभियंते प्रमोद बदामी, फोंडा जलस्रोत खात्याचे विभाग ४ चे साहाय्यक अभियंते शैलेश नाईक, फोंड्याचे संयुक्त मामलेदार जान्हवी कालेकर, उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच गोविंद परब फात्रेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकांच्‍या डोळ्यांना पाणी लावू नका

म्हादई नदीचे पाणी गोमंतकीयांना पुरेसे होते. मात्र, हे पाणी पळवण्यासाठी सरकारनेच कर्नाटकला मदत केली. त्यामुळे आणखी बंधारे बांधून लोकांच्या डोळ्यांना पाणी लावू नका. कुणाच्या हितासाठी हा प्रकल्प सरकार हाती घेत आहे, असा जाबही ग्रामस्थांनी यावेळी विचारला.

पाण्याची गरज भागवण्यासाठी बंधारा बांधण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्यामुळे तसा अहवाल आम्ही सरकारला देणार आहोत. इतरत्र अशाप्रकारचा विरोध होत नाही; पण इथेच विरोध होतोय.

- प्रमोद बदामी, मुख्य अभियंते, जलस्रोत खाते.

Public Hearing
Candolim: खोल विहीरीत पडला घोडा, रस्सी लावून सुखरूप काढले बाहेर

पंचायत मंडळ लोकांसोबत... : खांडेपार नदीवर बंधारा नकोच, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सोनारबाग - उसगावचे पंचसदस्य विनोद मास्कारेन्हस तसेच मुर्डी - खांडेपारचे पंचसदस्य अभिजीत गावडे यांनीही तीव्र विरोध केला आहे.

यासंबंधी उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर तसेच कुर्टी - खांडेपारच्या सरपंच संजना नाईक यांनीही आम्ही लोकांसोबत असल्याचे यावेळी सांगितले. सरकारने नागरी हितालाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

म्हादई आटल्यावर जाग आली का?

या सभांत खांडेपार नदीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या आराखड्याची माहिती देण्यात आली.

मात्र, ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. पाण्याचे नियोजन करायचे होते, तर ते आधी का केले नाही, आता म्हादईचे पात्र कोरडे पडल्‍यानंतर तुम्हाला जाग आली आहे काय, असा सवालही ग्रामस्थांनी केला. कोणत्याही स्थितीत बंधारा नकोच, आम्हाला घरेदारे सोडून जायचे नाही, असे ग्रामस्थांनी सुनावले.

Public Hearing
Goa to Indore Flight : गोव्याहून इंदूरला जाणारे 70 हून अधिक प्रवासी अडकले दाबोळी विमानतळावर

महापुराची धास्ती

दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये खांडेपार व म्हादई नदीला आलेल्या महापुरामुळे सोनारबाग - उसगाव व मुर्डी - खांडेपार गावाला मोठा तडाखा बसला होता. सोनारबाग येथील काही घरांना पाण्याचा धोका निर्माण झाला होता.

त्यावेळी बऱ्याच घरातील साहित्याची नासाडी झाली होती, त्यावेळी लोकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला होता, त्याची आठवण या दोन्ही सभांत ग्रामस्थांनी करून दिली. तर बंधारा बांधल्यानंतर महापुराचे संकट अधिक तीव्र होऊ शकते.

विशेष म्हणजे, या महापुरावेळी सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मंडळ आपद्गग्रस्तांना सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले होते. त्यामुळेच सरकारच्या योजनांची भीती वाटते. आमची घरे पाण्याखाली गेली तर...असा सवाल ग्रामस्थांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com