खोर्लीवासीयांची बिल्डरविरोधात आरोग्याधिकाऱ्यांकडे तक्रार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

‘व्हाइट कॅसल’ इमारतीच्या सोक पिटमधील मळ सार्वजनिक रस्त्यावर येत असल्याची तक्रार खोर्लीवासीयांनी म्हापसा आरोग्याधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. त्या निवेदनवजा तक्रारीवर खोर्ली भागातील कासारवाडा व सीम येथील नागरिकांच्या सह्या आहेत.

General म्हापसा  :  ‘व्हाइट कॅसल’ इमारतीच्या सोक पिटमधील मळ सार्वजनिक रस्त्यावर येत असल्याची तक्रार खोर्लीवासीयांनी म्हापसा आरोग्याधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. त्या निवेदनवजा तक्रारीवर खोर्ली भागातील कासारवाडा व सीम येथील नागरिकांच्या सह्या आहेत. यासंदर्भात स्थानिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, की ही तक्रार काही दिवसांपूर्वी देऊनही अद्याप त्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई शासकीय अधिकारिणीने केली नाही. या एकंदर प्रकारामुळे कासारवाडा-खोर्ली येथील रहिवाशांना तसेच तेथील रस्यावरून जाणाऱ्या लोकांना खूपच त्रास होत आहे.

त्या इमारत प्रकल्पात बावीस फ्लॅट्‍स असून तेथील सोक पिट भरून वाहू लागल्याने साहजिकच तो मळ रस्त्यावर येत आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या परिसरात या पूर्वी गडेकर कुटुंबात २८ ऑक्टोबर २०२० रोजी डेंग्यूचा रुग्ण सापडला होता, ही बाबही आरोग्यधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणू्न देण्यात आली आहे. या एकंदर प्रकारामुळे पसरणारी दुर्गंधी सहन करण्यापलीकडे आहे. स्थानिक नागरिकांना तसेच त्या मार्गावरून जाणाऱ्यांनाही त्याचा मोठा त्रास होत असतो. मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यासंदर्भात आरोग्याधिकार्‍यांनी प्राधान्यक्रमाने कार्यवाही करावी, अशी मागणी त्या नागरिकांनी केली आहे.
 

संबंधित बातम्या

Tags