कोल्हापुरातून मुलीचे अपहरण करणाऱ्याला 'गोव्यात' अटक

फातोर्डा पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोल्हापूर येथील राधानगरी पोलिसांकडून ही अपहरणाची माहिती मिळाली.
कोल्हापुरातून मुलीचे अपहरण करणाऱ्याला 'गोव्यात' अटक
kidnapper Arrested in Goa PoliceDainik Gomantak

सासष्टी: कोल्हापूर (Kolhapur) येथील राधानगरी (Radhanagari) पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून गोव्यात आणणाऱ्या संशयिताला अटक करण्यात फातोर्डा पोलिसांना यश मिळाले. सबीर शेख (34, बिहार) असे संशयिताचे नाव असून अपहृत मुलीची सुटका करण्यात आली आहे. (kidnapper arrested in Goa)

फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोल्हापूर येथील राधानगरी पोलिसांकडून ही अपहरणाची माहिती मिळाली. राधानगरी पोलिसांनी पाठवलेल्या संशयिताच्या छायावरून पोलिसांनी गोव्यात तपास करण्यास सुरुवात केली. फातोर्डा पोलिसांना चंद्रवाडा - फातोर्डा येथे एका भाड्याने घेतलेल्या खोलीत संशयीत आणि अपहृत मुलगी राहत होता.

kidnapper Arrested in Goa Police
Goa: आंतरराज्य मोबाईल स्नॅचीर्स प्रकरणात दोघाना केली अटक

फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली तसेच बिगर सरकारी संस्थेच्या सहकार्याने पोलिसांनी तात्काळ छापा मारून सशयिताला अटक केली तर मुलीची सुटका केली. पोलिसांनी संशयिताला व मुलीला पुढील सोपस्कारासाठी राधानगरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com