Taxi App: 'गोवा सरकार अंबानींच्या खिशात, सरकारलाही भाडेपट्टीवर घेणार'

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

केंद्रात व राज्यात आता अदानी व अंबानी स्वत:चे राज्य चालवत आहेत. रिलायन्सच्या बॅनरखाली ‘अपना भाडा’ हा टॅक्सी ॲप व्यवसाय सुरू झाला आहे.

म्हापसा: केंद्रात व राज्यात आता अदानी व अंबानी स्वत:चे राज्य चालवत आहेत. रिलायन्सच्या बॅनरखाली ‘अपना भाडा’ हा टॅक्सी ॲप व्यवसाय सुरू झाला आहे. या टॅक्सी ॲप व्यवसायामुळे मूळ गोमंतकीय टॅक्सीचालकांना(Goa Taxi) बेरोजगार करण्याचा गोवा सरकाचा(Goa Government) विचार आहे. अपना भाडा या टॅक्सी ॲप सेवेला(Taxi App) व्यवसायाला सरकारचा परवाना नसताना राज्य सरकारला अंबानी(Ambani) खिशात घालून धंदा सुरू करीत आहे, असा दावा करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Pramod Sawant) यांनी ती ॲप सेवा गोव्‍यातून त्वरित हाकलून लावावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे(Goa Forword party) कार्याध्यक्ष किरण कांदोळकर(kiran kandolkar) यांनी पत्रकार परिषदेत केली.(Kiran Kandolkar demands ban on Apna Bhada taxi app service from Goa)

Goa : राज्यातील अभियांत्रिकीच्या तब्बल तीनशे जागा रिक्तच 

कांदोळकर म्हणाले, गोव्यातील टॅक्सीचालक मागच्‍या दीड वर्षापासून गोवा माइल्स या ॲप सेवेच्या विरोधात आंदोलन करीत आहे. पण, सरकार या टॅक्सीचालकांच्‍या आंदोलनाला किंमतच देत नाही. राज्य सरकार स्वत:चा अहंकार सोडत नाही. अशावेळी अंबानी ‘अपना भाडा’ ही टॅक्सी ॲप सेवा गोव्यात कुठलाही परवाना न घेता चालू करीत आहेत. वाहतूकमंत्री व मुख्यमंत्र्यांना या कंपनीच्या लोकांकडून अपमानाची भाषा ऐकावी लागते. अंबानी यांचा तो व्यवसाय असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याचे धाडस नाही. 30 एप्रिल 2021 रोजी अपना भाडा या ॲप सेवा कंपनीने गोव्यात प्रवेश केला. पण, त्याबाबत कुठल्याही खात्याकडून परवाना घेतलेला नाही, असेही कांदोळकर म्हणाले.

तर अंबानी आता सरकारलाही भाडेपट्टीवर घेणार
अंबानी आता गोवा सरकारलाही भाडेपट्टीवर घेणार आहे, असा आरोप किरण कांदोळकर यांनी केला. गोमंतकीय टॅक्सीचालकांची सरकारकडून नेहमीच सतावणूक होत आहे. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेत सामान्य लोकांचे उद्योगधंदे बंद पडले. पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे टॅक्सीचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. टॅक्सीचालकांना डिजिटल मीटर बसवण्याची सक्ती करताना त्यांच्या भवितव्याचा विचार सरकार करणार आहे की नाही? राज्य सरकार बाहेरून येणाऱ्या टॅक्सी ॲप सेवा देणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे व स्थानिकांना वेगळा न्याय देत आहे, असे कांदोळकर म्हणाले.

IVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या

बादेंशातील मतदारसंघात निवडणुका लढवणार...
गोवा फॉरवर्ड पक्ष बार्देश तालुक्यातील चार मतदारसंघांत निवडणुका लढवण्यास सज्ज आहे. यदाकदाचित जुलै महिन्यात निवडणुका झाल्या तरी आम्ही थिवी व हळदोणे मतदासंघात तयार आहोत. आपले कार्यकर्ते सज्ज आहेत. ते निवडणुकीची प्रतीक्षा करीत आहेत, असा आत्मविश्वास माजी आमदार कांदोळकर यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या