किरण कांदोळकर यांचा आज गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

थिवी मतदारसंघांचे भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर या मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य व भाजपच्या कार्यकर्त्यांसह सोमवार २६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अस्नोडा कदंब बसस्थानकावरील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गोवा फॉरवर्ड पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत.

म्हापसा : थिवी मतदारसंघांचे भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर या मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य व भाजपच्या कार्यकर्त्यांसह सोमवार २६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अस्नोडा कदंब बसस्थानकावरील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गोवा फॉरवर्ड पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने त्यांचे कार्यकर्ते सध्या प्रयत्नशील आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, किरण कांदोळकर यांच्याबरोबर गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुमारे पंचवीस ते तीस सरपंच व पंच सदस्यांचा समावेश असेल. त्यामध्ये थिवीच्या सरपंच शर्मिला गडेकर, उपसरपंच संदीप कौठणकर, पंच सदस्य विठ्ठल वायंगणकर, युगेश सातार्डेकर, मायकल फर्नांडीस, लिओ परेरा. सिरसईचे सरपंच दिनेश फडते, उपसरपंच रेश्मा पार्सेकर, पंच आनंद तेमकर. अस्नोडाचे सरपंच शंकर नाईक उपसरपंच छाया बिचोलकर, पंच सदस्य शैलेश साळगावकर, रोश्णाली कवळेकर, प्रवीण बुगडे. कामुर्लीचे सरपंच विशांक नाईक गावकर, उपसरपंच अभय पेडणेकर, पंच सदस्य तुषार नाईक, दिव्या परब. कोलवाळचे पंचायत सदस्य दशरथ बिचोलकर, प्रियांका बिचोलकर, रती वारखंडकर. रेवोडाचे सरपंच राहुल फडते, उपसरपंच शमिका नाईक फडते, पंचसदस्य माया हरमलकर, वल्लभ फडते व श्रीकांत मांद्रेकर, नादोडाच्या सरपंच मधुरा मांद्रेकर, उपसरपंच देवेश रेडकर, पंचसदस्य विश्वाजी हळदणकर, पीर्णच्या पंचायतसदस्य नारलीयो लोबो यांचा समावेश होतो. यासंदर्भात कांदोळकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस या सर्व सरपंचांची तसेच पंचायत सदस्यांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या