किरण कांदोळकरांनी पत्नीसह तृणमुल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) आणि त्यांच्या पत्नी कविता तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
किरण कांदोळकरांनी पत्नीसह तृणमुल काँग्रेसमध्ये केला प्रवेश
Kiran Kandolkar Dainik Gomantak

किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) आणि त्यांच्या पत्नी कविता तृणमुल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला आहे. दरम्यान, गोवा फॉरवर्डने (Goa Forward) उत्तर गोव्यातील संपूर्ण भिस्त ज्यांच्यावर ठेवली होती त्याच पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी गोवा फॉरवर्डला आज रामराम ठोकल्याने गोवा फॉरवर्डला जबरदस्त धक्का बसला असून त्यामुळे उत्तर गोवा सर करण्याचे गोवा फॉरवर्डचे मनसुबे ढासळले आहेत. कांदोळकर तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाला धक्का देत त्या पक्षाला सिडचिट्ठी दिलेले माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आपली पत्नी कविता व अन्य कार्यकर्त्या बरोबर तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तृणमुलच्या गोवा प्रभारी माहुवा मोईत्रा यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी तृणमुलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि गोव्याचे नेते लुईझीन फालेरो हे उपस्थित होते. गोव्यात भाजपचा पराभव करणे फक्त तृणमूल काँग्रेस पक्षालाच शक्य असून त्यामुळेच ममता दिदींच्या पक्षात प्रवेश केल्याचे कांदोळकर यांनी सांगितले. कांदोळकर यांनी आज सकाळीच गोवा फॉरवर्डच्या कार्याध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Kiran Kandolkar
गोवा फॉरवर्डला मोठा धक्का; किरण कांदोळकरांनी पक्षाला ठोकला राम-राम

यावेळी बोलताना लुईझीन फालेरो यांनी गोव्यातील बहुजन समाजाचा फक्त तृणमूल काँग्रेसवर विश्वास असून यापुढे बहुजन समाजातील आणखी नेते यापक्षात सामील होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तत्पूर्वी कांदोळकर याना नवीन युतीत आपल्याला तसेच आपल्या पत्नीला उमेदवारी मिळणार याबाबत खात्री नसल्यानेच त्यांनी गोवा फॉरवर्ड सोडला असावा अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. गोवा फॉरवर्ड काँग्रेस पक्षा बरोबर युती करत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com