''पालिका संचालकांची बदली केल्यास गोवा फॉरवर्डतर्फे आवाज उठविला जाईल'' 

''पालिका संचालकांची बदली केल्यास गोवा फॉरवर्डतर्फे आवाज उठविला जाईल'' 
Goa

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पालिका संचालकांनी पाच पालिकांसाठीची प्रभाग आरक्षण अधिसूचना नव्याने जारी करून महिला, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमाती समाजातील लोकांना न्याय दिला आहे. या नव्याने काढण्यात आलेल्या अधिसूचने बाबत भाजपच्या काही नेत्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पालिका संचालकांची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू झाला आहे. 

जर सरकारने पालिका संचालकांची बदली केल्यास तो बहुजन समाजावर केलेला अन्याय असेल. व यावर गोवा फॉरवर्डतर्फे या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जाईल असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला. 

सर्वोच्च न्यायालयाने पालिका आरक्षण संदर्भात निर्देश देण्यापूर्वी सरकारने व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिका संचालकांवर दबाव आणून पालिका प्रभाग आरक्षण आपल्या मर्जीनुसार करून घेतले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांना पालिका संचालकांना सामोरे जावे लागले होते. त्याचे भान ठेवून त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून नव्याने पाच पालिकांची प्रभाग आरक्षण अधिसूचना जारी केली असे कांदोळकर म्हणाले.


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com