हळदोणे मतदारसंघात किरण कांदोळकरांना उमेदवारी द्यावी: गोवेकर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

सतीश गोवेकर म्हणाले, की टिकलोंऐवजी कांदोळकर हळदोणेचे आमदार झाल्यास ते हळदोणे मतदारसंघवासीयांचे भाग्य ठरणार आहे. हळदोणेचे आमदार टिकलो यांनी किरण कांदोळकर यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्याअगोदर पूर्ण विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

म्हापसा: हळदोणे विधानसभा मतदारसंघात यापुढे विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांच्याऐवजी थिवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा हळदोणे मतदारसंघाचे भूमिपुत्र किरण कांदोळकर यांना भाजपाने  उमेदवारी दिल्यास आम्ही प्राणपणाने त्यांच्या विजयासाठी कार्यरत राहणार आहोत, अशी ग्वाही नास्नोडा पंचायतीचे सदस्य सतीश गोवेकर यांनी दिली.

 

सतीश गोवेकर म्हणाले, की टिकलोंऐवजी कांदोळकर हळदोणेचे आमदार झाल्यास ते हळदोणे मतदारसंघवासीयांचे भाग्य ठरणार आहे. हळदोणेचे आमदार टिकलो यांनी किरण कांदोळकर यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्याअगोदर पूर्ण विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. ज्या वेळी मतदारसंघातील तमाम जनतेला आधार देणे गरजेचे होते तेव्हा आमदार टिकलो कुठे लपून बसले होते, असा सवालही सतीश गोवेकर यांनी केला आहे.

 

या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी किरण कांदोळकरांच्या आगमनाचे स्वागत केलेले आहे; कारण, त्यांनी केवळ निवडक लोकांना मदत केलेली नाही, तर भाजपाच्या समर्थकांनाही मदत केली आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत भाजपाचे कार्यकर्ता व मतदारसंघातील जनताही संभ्रमित झाली होती. अशा स्‍थितीत त्यांना मदतीची गरज होती व त्याच प्रतीक्षेत लोक होते; पण, आमदार टिकलो त्या वेळी कुठे भूमिगत झाले, हे मला माहीत नाही. अशा वेळी किरण कांदोळकर यांनीच सर्वांना मदतीचा हात दिला, असेही ते म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या