kishor bandekar
kishor bandekar

बुद्धिबळ संघटनेच्या खजिनदारपदासाठी बांदेकर इच्छुक

पणजी: गोवा बुद्धिबळ संघटनेच्या यावेळच्या व्यवस्थापकीय समिती निवडणुकीत सध्याचे सचिव किशोर बांदेकर खजिनदारपदासाठी इच्छुक आहेत. ते वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या गटाचे उमेदवार असतील. (Kishor Bandekar is aspiring for the post of treasurer of Goa Chess Association.)

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी सध्या काब्राल आहेत. त्यांचा गट पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात असेल हे जवळपास निश्चित आहे. संघटनेची निवडणूक येत्या 30 जुलै रोजी होईल. बांदेकर यांनी सांगितले, की सचिवपद वगळता अन्य पदासाठी मी निवडणूक रिंगणात असेन, कदाचित खजिनदारपदासाठी माझा अर्ज असेल. काब्राल यांना मी आश्वासन दिले आहे, त्यामुळे मी निवडणूक लढविणार आहे.

बांदेकर हे गोवा बुद्धिबळातील अनुभवी प्रशासक आहेत. 2013-2017 आणि 2017-2021 अशा दोन मुदतीसाठी सचिवपद भूषविलेले बांदेकर यांनी यापूर्वी राज्य संघटनेत सदस्य, उपाध्यक्ष, खजिनदार आदी पदे भूषविली आहेत. बांदेकर यांच्या कार्यकाळात 2018 पासून गोव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खुली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली. 2017 ते 2020 या कालावधीसाठी ते अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार होते, मात्र गेल्या जानेवारीत झालेल्या महासंघाच्या निवडणुकीत खजिनदारपद त्यांना अवघ्या चार मतांच्या फरकाने हुकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com