New Zuari Bridge: 'असा' आहे नवीन झुआरी पूल; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा केबलस्ट्रेड पुल; एकूण लांबी 13 किलोमीटर
New Zuari Bridge
New Zuari Bridge Rohan Fernandes

New Zuari Bridge: उत्तर व दक्षिण गोव्याला जोडमाऱ्या नवीन झुआरी पुलाचे आज उद्घाटन होत आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर आगशी, कुठ्ठाळी ते वेर्णापर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. नवीन झुआरी पुल हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा केबलस्ट्रेड पुल आहे. या पुलाविषयीच्या इंटरेस्टिंग गोस्टी जाणून घेऊया.

New Zuari Bridge
New Zuari Bridge: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली नवीन झुआरी पुलाची पाहणी...

2016 मध्ये पुलाची पायाभरणी

झुआरी नदीवर बांधण्यात आलेल्या या नवीन पुलाची पायाभरणी जानेवारी 2016 मध्ये करण्यात आली होती. तेवहापासून तीन टप्प्यांत या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पहिला टप्पा बांबोळी ते आगशी असा 8.23 किलोमीटरचा आहे. दुसरा टप्पा 4.31 किलोमीटरचा असून तो कुठ्ठाळी ते वेर्णा असा आहे. तर तिसरा टप्पा आगशी ते कुठ्ठाळी असा 1.08 किलोमीटरचा आहे.

पुलाची लांबी

पुलाची जोडरस्त्यांसह एकूण लांबी 13.63 किलोमीटर इतकी आहे. तर केवळ नदीवर पुलाच्या भागाची लांबी 8.2 किलोमीटर इतकी आहे.

पुलाचा एकूण खर्च

पुलाचा एकूण खर्च 2701 कोटी रूपये इतका आहे.

New Zuari Bridge
Zuari Bridge Traffic : उद्घाटनाआधीच झुआरीवर पुन्हा वाहतूक कोंडी

पुलावर टॉवरसह हॉटेलचे उभारणार

भविष्यात या पुलावर दोन मोठे टॉवर उभारले जाणार आहेत. त्यासाठी 130 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हा टॉवर देशविदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकेल. येथे आर्ट गॅलरी, रेस्टॉरंट अशा सुविधा उभारण्याचा मानस आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा केबलस्ट्रेड पूल

नवीन झुआरी पूल देशातील दुसऱ्या क्रमांकाचा केबलस्ट्रेड पूल ठरणार आहे. या पुलामध्ये 56 केबल्स जोडण्यात आल्या आहेत. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील डॉ. भुपेन हजारिका ब्रिज हा भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल असून तो 9.15 किलोमीटर लांबीचा आहे. या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 2020 साली झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com