Rath Saptami: रथसप्तमी - सूर्याच्या जन्मदिवसाची आख्यायिका...

गोव्यासह देशात विविध ठिकाणी पारंपरिकरित्या साजरा होतो उत्सव
Rath Saptami
Rath SaptamiDainik Gomantak

- आसावरी कुलकर्णी

Rath Saptami: माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी सूर्यदेव सात घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाश देऊ लागला अशी आख्यायिका आहे. पहाटे मंगल स्नान, सूर्याला अर्घ्य देणे, आणि सूर्य पूजन करणे असे या उत्सवाचे स्वरूप असते.

Rath Saptami
Goa: खरेच, घटक राज्याचा दर्जाही आपण गमावून बसू?
Rath Saptami
Rath Saptami Dainik 'Gomantak

या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत. या दिवशी सात घोडे (उच्चैःश्रवा) आणि सारथी अरुण (गरूडाचा मोठा भाऊ) यांसह सूर्याची पूजा करतात.

अंगणातली खीर!

आपल्या उत्सवांचा संबंध हा बदलत्या ऋतुशी असतो. हेमंत ऋतू संपून आजपासून वसंत सुरू झाला अस मानलं जातं. गोवा आणि महाराष्ट्रातल्या काही भागात घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावनासमोर गोवऱ्यांच्या (शेणी) चुलीवर तांदळाची खीर बनविण्याची पद्धत आहे. याला पायस असं म्हणतात.

सुर्यकिरणांमधून व्हिटॅमिन डी मिळते हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच आजच्या दिवशी कोवळ्या उन्हात शेणीच्या चुलीवर बनवलेली खीर ही औषधी असते, असं मानलं जातं. शेणीच्या धुरात शिजवलेली ही खीर खरोखरच चविष्ट लागते. दक्षिण भारतात सुद्धा अशी खीर बनवण्याची पद्धत आहे.

अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ऊतू जाऊ देणे, हे व्रताचे स्वरूप असते. दक्षिण भारतात या खिरीला पोंगल असेही म्हटले जाते. काही भागात सूर्याच्या किरणांमध्ये गरम झालेल्या पाण्याने तान्ह्या मुलांना आंघोळ घातली जाते.

Rath Saptami
Rath Saptami Dainik Gomantak
Rath Saptami
Republic Day 2023: व्यथा अभिव्यक्तीची!
Rath Saptami
Rath Saptami Dainik Gomantak

हळदी कुंकू समारंभाची सांगता

मकर संक्रांतीपासून महिला वर्गामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम सुरू होतो. एकत्र येऊन वाण लुटणे असे कार्यक्रम या निमित्ताने केले जाते. रथप्तमीच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होते.

गोव्यात सूर्योपासना प्राचीन काळापासून केली जाते. रथसप्तमी हा अशाच सूर्योपासनेचा भाग आहे. पूर्वजांनी निसर्गाशी तादात्म्य साधत सुरू केलेल्या अशा व्रतवैकल्यामुळे आपल्या परिसरातील बदलांची जाणीव आपल्याला होते. आणि निसर्गापासून मिळणाऱ्या शाश्वत उर्जेला आपण योग्य तो मान देतो, हेच या सणाचं आजच्या काळातल महत्व!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com