कोकण रेल्‍वेचे दरवर्षी १०० कोटी वाचणार; मेपासून विद्युत रेल्वे धावणार

प्रतिनिधी
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ११०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेच्या इंधनावर खर्च होणारे १०० कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत.  

मडगाव - कोकण रेल्वेच्या ७६० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर मे महिन्यापासून विद्युत रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ११०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेच्या इंधनावर खर्च होणारे १०० कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत.  

गो कोकण रेल्वेच्या रोहा - महाराष्ट्र ते ठोकूर कर्नाटकपर्यंतच्या पूर्ण मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. गोव्यात वीज तारा वाहून नेणाऱ्या पोलादी कमानी उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे ज्येष्ठ व्यवस्थापक बबन घाटगे यांनी दिली. 

गृहिणींचे बजेट ढासळणार; एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ 

रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. कर्नाटकातील बिजूर ते ठोकूर या १०० किलोमीटरच्या टप्प्याचे विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत रेल्वे सुरूही करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही एका टप्प्याचेही काम पूर्ण झाले आहे. तिथे सुरक्षाविषयक चाचणी सुरू आहे. मे महिन्यात संपूर्ण ७६० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण आहे, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डिझेल इंधनावर होणाऱ्या खर्चापैकी १०० कोटी रुपयांची  कोकण रेल्वेला दरवर्षी बचत होणार आहे. या आर्थिक लाभाबरोबरच डिझेल इंधनामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसानही टळणार आहे, असे घाटगे यांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी गोवा सरकारने मागितली केंद्राकडे मदत 

संबंधित बातम्या