GOA: रेल्वे पोलिसांच्या कारवाईत 404 दारूच्या बाटल्या जप्त

 bottles of liquor
bottles of liquor

सासष्टी: कोकण रेल्वे सुरक्षा दलाच्या(Konkan Railway Security Force police) पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत 65 हजार रुपयांच्या 404 दारुच्या बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी या प्रकरणी राजू मंडल (30, पश्चिम बंगाल), अनुज गौतम (22, उत्तर प्रदेश) आणि सत्यम सेन (20, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या अबकारी विभागाकडे सुपूर्द केल्या. (Konkan Railway Security Force police seized 404 bottles of liquor)

रेल्वे सुरक्षा दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24  मे रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. 3 वर दोन संशयित दारूच्या बाटल्या घेऊन ट्रेनमध्ये बसून जाण्याच्या तयारीत असताना, गस्तीवरील पोलिसांनी त्या दोघांच्या बॅगा तपासल्या असता, पोलिसांना त्यांच्याजवळ 20 हजार 586 रुपयांच्या 201 दारुच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी या प्रकरणी राजू मंडल आणि अनुज गौतम याना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला. 

25 मे रोजी रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांना ट्रेनमध्ये तपासणी करत असताना, तीन बॅगा सापडल्या. या बॅगांची पाहणी केल्यावर पोलिसांनी २३ हजार ४०० रुपयांच्या 120 दारुच्या बाटल्या सापडल्या. तर, त्याच दिवशी मडगाव रेल्वे स्थानकावरील जबलपूर एक्स्प्रेसची तपासणी करताना, एका इसमाकडे तीन बॅगा दिसून आल्या. पोलिसांनी या बॅगांची झडती घेतल्यावर त्यांना 21 हजार 150 रुपयांच्या 84 दारुंच्या बाटल्या आढळल्या, पोलिसांनी त्या त्वरित जप्त केल्या. या प्रकरणी सत्यम सेन याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी केलेल्या या तिन्ही कारवाईत 65 हजार रुपयांच्या 404 बाटल्या जप्त केल्या असून या बाटल्या अबकारी विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com