Konkan Railways : नाताळनिमित्त कोकण रेल्वेच्या 3 खास ट्रेन्स

नाताळचा सण जवळ ठेपला असल्याने पुण्या-मुंबईतील कित्येक गोमंतकीय गोव्यात येणार असल्याने कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तीन खास गाड्यांची व्यवस्था केली आहे.
Special train
Special trainDainik Gomantak

नाताळचा सण जवळ ठेपला असल्याने पुण्या-मुंबईतील कित्येक गोमंतकीय गोव्यात येणार असल्याने कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तीन खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. पुणे-करमळी-पुणे या मार्गावर 01445 व 01446 या ट्रेन्स धावणार आहेत. 01445 ही गाडी 16 डिसेंबर ते 13 जानेवारी 2023 दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून संध्याकाळी 5.30 वाजता सुटेल व करमळी येथे दुसऱ्या दिवशी 8.30 वाजता पोहोचेल. 01446 ही ट्रेन 18 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 दरम्यान दर रविवारी करमळीहून सकाळी 9.20 वा. सुटेल व त्याच दिवशी रात्री 11.35 वा. पुण्याला पोहचेल.

दुसरी गा़डी करमळी आणि पनवेल दरम्यान धावेल. 01448 ही गाडी 17 डिसेंबर ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत दर शनिवारी गोव्यातील करमळीहून सकाळी 9.20 वाजता सुटेल व पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 8.15 वाजता पोहचेल. 01447 ही ट्रेन 17 डिसेंबर ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत दर शनिवारी पनवेलहून रात्री 10 वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पोहचेल.

Special train
IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल, पुजारा-गिलच्या शतकाने गाजवला तिसरा दिवस

तिसरी ट्रेन करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावेल. 01459 क्रमांकाची गाडी 19 डिसेंबर ते 11 जानेवारी 2023 दरम्यान दर सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री 8.45 वाजता सुटेल व करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पोहचेल. 01460 ही गाडी 20 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत दर मंगळवार आणि गुरुवारी करमळीहून सकाळी 9.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला त्याच दिवशी 9.30 वाजता पोहचेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com