Konkani Circular In UK: थेट ब्रिटनमध्ये झळकले कोकणी भाषेतील परिपत्रक, कारण काय जाणून घ्या

मातृभाषेत प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकामुळे कोकणी लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.
UK Police issues circular in Konkani
UK Police issues circular in KonkaniDainik Gomantak

UK Police issues circular in Konkani: प्रत्येकाचे त्याच्या मातृभाषेवर प्रेम असते, मायबोलीत लिहणे, वाचणे किंवा टीव्ही आणि चित्रपट पाहण्याला प्रत्येकाला अभिमान वाटतो. परदेशात किंवा पर प्रांतात आपण जातो त्यावेळी कोणी आपल्या प्रदेशातील आपलीच भाषा बोलणारे भेटले तर उर अभिमानाने भरून येतो.

पण, युकेमध्ये एका शहरात चक्क कोकणी भाषेत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, समस्त कोकणी भाषिकांसाठी ही आनंदाची बाब आहे.

ब्रिटनमधील विल्टशायर पोलिसांच्या वतीने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परिपत्रक कोणत्या तरी निवडणुकीबाबत भाष्य करत असून, येथील लोकांना बनावट मतदानापासून आणि अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राण्याचा सल्ला यात दिला आहे.

विल्टशायर भागात राहणाऱ्या कोकणी लोकांचा विचार करता, विल्टशायर पोलिसांच्या कॉम्प्लेक्स फ्रॉड टीमच्या वतीने रोमन लिपीत कोकणी भाषेत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मातृभाषेत प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकामुळे कोकणी लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.

UK Police issues circular in Konkani
Mumbai-Goa Vande Bharat: खुशखबर! वंदे भारत ट्रेन लवकरच मुंबई-गोवा महामार्गावर सुरू होणार, आज चाचणी

कामानिमित्त जगाच्या पाठीवर विविध देशात गोव्यातील कोकणी भाषिक लोक विस्तारले आहेत. ब्रिटनमध्ये विविध कंपनीत विविध पदावर कोकणी लोक कार्यरत आहेत. तसेच, व्यवसाय किंवा इतर कामानिमित्त कोकणी लोक ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत.

कोकणी परिपत्रकामुळे गोव्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून ब्रिटनमध्ये हे परिपत्रक सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com