Konkani writer: प्रसिद्ध कोकणी लेखक रेवणसिद्ध रामनाथ नाईक यांचे निधन

अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली
Konkani writer
Konkani writerDainik Gomantak

कोकणी भाषेचे जाणकार, प्रसिद्ध कोकणी लेखक रेवणसिद्ध रामनाथ नाईक यांचे निधन झाले शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. भाषा आणि साहित्यातील योगदानाबद्दल कोकणी भाषा मंडळाने नुकताच डॉ. नाईक यांचा सत्कार केला होता. त्यांच्या साहित्याला गोवा राज्यात मोठा वाचक वर्ग आहे. त्यांच्या लिखानाने कोकणी भाषेच्या सौंदर्यात आणखी भर टाकली आहे.

(Konkani writer poet Revanasiddh Ramnath Naik passed away)

Konkani writer
Margao Municipality: गोवा फॉरवर्ड पार्टी, काँग्रेसला खिंडार; 7 नगरसेवक भाजपमध्ये दाखल

डॉ. रेवणसिद्ध रामनाथ नाईक गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नाईक यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1971 रोजी सांगली येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच कोकणी नाटक आणि संगीताची आवड होती. कोकणी गीतसंगीताचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यांनी स्वतः ची गाणी संगीतबद्ध आणि मांडणी करण्यास सुरुवात केली होती.

Konkani writer
Navewade: पाणी मिटर चोरी प्रकरणात एकाला अटक

कवी, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक

नाईक यांनी शाळेत नववीत असताना गोव्यातील कवी उल्हास बुवा यांच्या मंगळूर शहरात एक चेंडू देखीला' या गाण्यावर आधारित गाणे तयार करुन शाळेत सादर केले होते. तसेच नाईक यांनी एक कवी, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, वक्ता, नगरसेवक आणि एक कुशल सुत्रसंचालक अशा एकाहून अधिक भुमिकेत स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामूळे त्यांच्या कलाकृती आणि साहित्याला वाचणारा एक वर्ग ही तयार झाला आहे. ऐंशीच्या दशकातील कलाकार. एक कुशल लोकप्रिय संघटक म्हणून त्यांची ओळख होती.

नाईक यांची निधन वार्ता समजाच राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी एका कष्टकरी, माजी नगरसेवक व्यक्तीच्या निधनाने मला खूप दुःख झाल्याचे म्हटले आहे. तसेच काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी ही शोक व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com