गोव्यातील 509 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लस

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

गोवा राज्यात आज सहा इस्पितळांमध्ये कोविड व्हॅक्सिनेशन अंतर्गत कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली. डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी अशा एकूण 509 जणांना आज कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

पणजी:  गोवा राज्यात आज सहा इस्पितळांमध्ये कोविड व्हॅक्सिनेशन अंतर्गत कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली. डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी अशा एकूण 509 जणांना आज कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील दोन केंद्रामध्ये 129 जणांना, डॉ. केदार फडते इस्पितळ पणजी येथील 61 जणांना व मणिपाल इस्पितळ दोनापावला येथील 100 जणांना आज कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

त्याचबरोबर दक्षिण गोव्यातील एसएमआरसी इस्पितळामधील 97 जणांना, हॉस्पिसियो इस्पितळातील 100 जणांना व आयुर्वेदिक महाविद्यालय शिरोडा येथील 22 जणांना कोविड प्रतिबंधक लस आज टोचण्यात आली. कालपर्यंत 2926 जणांना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली होती. आजच्या 509 जणांची मिळून राज्यात आत्तापर्यंत 3435 डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

गोवा विधानसभा अधिवेशन: सरकारी जमिनीवरील बांधकामे नियमित करण्यासाठी सरकार यंत्रणा उभारणार -

संबंधित बातम्या