गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्याअध्यक्षपदी कृष्णी वाळकेची निवड
Krishni Walke elected as President of Gomantak Rashtrabhasha UniversityDainik Gomantak

गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्याअध्यक्षपदी कृष्णी वाळकेची निवड

नूतन कार्यकारी समितीचा कार्यकाळ 2021 ते 2024 असा असेल.

फातोर्डा: गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ नूतन कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती कृष्णी वाळके यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारी समितीचा कार्यकाळ 2021 ते 2024 असा असेल.

इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः दिनेश लखो नाईक (कार्याध्यक्ष), उदय रघुवीर नाईक (सचिव), स्वरुपा सत्यवान कुंदे (कोषाध्यक्ष), अभय ठावरमल सुराणा, रोशन रामदास लोटलीकर (उपाध्यक्ष), श्रीमती ज्योती कृष्णा कुलकर्णी (सह सचिव), सदस्य - सुमन काशीनाथ सामंत, कांचन उदय बोरकर, चंदा कित्तूर, प्रसाद रघुवीर सावंत, डॉ. किरण नवनाथ पोपकर, सहेली मंगलदास बोरकर 26 रोजी सकाळी 10 वाजता रवींद्र भवन मडगाव येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. पांडुरंग शिरगावकर, प्रा. वृषाली मांद्रेकर, डॉ. आशा गहलोत, श्रीमती जयश्री रॉय हरमलकर व डॉ. किरण पोपकर यांचा हिंदी सेवा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येईल.

Krishni Walke elected as President of Gomantak Rashtrabhasha University
गोवा विभागातील सिनेमांच्या घोषणेमुळे गोमंतकीयांना दिलासा

डॉ. पांडुरंग शिरगावकर लिखित मुक्तीबोध की सर्जनात्मक सामाजिक चेतना व कहानी कुंज या दोन पुस्तकांचे प्रकाशन करणयात येणार आहे. वाचन, निबंध, कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे, प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. माजी खासदार नरेंद्र सावईकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहतील. खास पाहुणे म्हणून डॉ. राकेश कुमार शर्मा, दामू नाईक, डॉ. वर्षा सोळंकी, नरेंद्र दंढारे उपस्थित राहतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com