कुडचडे रेल्‍वे स्‍थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

सध्या रेल्‍वे गाड्यांची धावपळ नसली तरी कुडचडे रेल्‍वेमार्ग बांधकामाला चांगल्यापैकी जोर आला आहे. 

कुडचडे : कुडचडे शहराची खरी ओळख निर्माण झाली ती रेल्वेमुळे. एकेकाळी या शहराला बरकत आली होती. खनिज चढ-उतारचे प्रमुख केंद्र बनले होते. पण, खाण बंदीनंतर रयाच बदलून गेली आहे. रेल्वे मार्ग रुंदीकरण कामामुळे रेल्‍वे गाड्यांची धावपळ थांबली. कोरोना काळात पूर्णपणे काम आणि रेल्‍वेगाडी बंद झाल्याने होत्याचे नव्हते झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. कुडचडे बाजारावर या सर्व परिस्थितीचा परिणाम जाणवला. आता कुठे रेल्‍वे गाड्यांची धावपळ नसली तरी रेल्‍वेमार्ग बांधकामाला चांगल्यापैकी जोर आला आहे. 

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची अखेर गोवा सरकारने घेतली दखल

कुडचडे रेल्वे स्थानकाला एकच प्लॅटफार्म होता. आता रुंदीकरण कामामुळे नवीन प्लॅटफॉर्म कामाला गती प्राप्त झाली आहे. प्रवासी ओव्हरब्रिजला आता नवी झळाळी प्राप्त झाली आहे. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी जीना तयार करण्यात आला आहे. नवीन रेल्‍वेमार्गवर रुळ बसविण्यात आले. स्थानकात कार्यालय आणि अधिकारी कक्षा बरोबर इतर आवश्यक बांधकाम पूर्ण होऊ लागली आहे. मार्ग बांधकामाला सावर्डे, कुडचडे मतदारसंघात कुठेच विरोध करण्यात आलेला नाही. या भागातील नागरिकांनी या कामाला एक प्रकारे पाठिंबा दर्शविला आहे.

कडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारची एकही योजना नाही

नवीन रेल्‍वेगाड्या या स्थानकावरून धावू लागताच, परत एकदा कुडचडे शहराला बरकत येऊ शकते. बंद पडलेल्या आणि नवीन गाड्या या स्थानकावरून जाताना थांबा घ्यावा, जेणेकरून प्रवासी चढ - उतार होईल. त्यातून बाजारात थोडी रेलचेल होईल. भविष्यात मालाची वाहतुकीचे कुडचडे केंद्र बनल्यास कुडचडे शहराला परत जुने दिवस प्राप्त होऊ शकतात. वाढत्या विरोधामुळे रुंदीकरण काम कुठेही पोहोचले. पण, कुडचडे स्थानकात येणाऱ्या कामाला जोर लाऊन ती जलदगतीने पूर्ण करण्याचा मानस रेल्वेने आखला आहे, हे सुरू असलेल्या कामावरून स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या