कुडचडे युवक काँग्रेसतर्फे राजीव गांधी जयंती

प्रतिनिधी
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे नेते स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुडचडे युवक काँग्रेसतर्फे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशे रोपटी वितरित करण्यात आली, तर काही रोपटी काकोडा येथील सिद्धामाटी येथे लावण्यात आली. 

कुडचडे: प्रतिनिधी माजी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे नेते स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुडचडे युवक काँग्रेसतर्फे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशे रोपटी वितरित करण्यात आली, तर काही रोपटी काकोडा येथील सिद्धामाटी येथे लावण्यात आली. 

यावेळी  कुडचडे काँग्रेस गट अध्यक्ष पुष्कल सावंत म्हणाले, की माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर वनमहोत्सव साजरा होत असून त्याचाच एक भाग म्हणून आज कुडचडे मतदारसंघात युवक काँग्रेसने पुढाकार घेऊन वनमहोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आज वनमहोत्सव काळाची गरज बनली आहे. हा संदेश जनतेला देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. विराज नागेकर म्हणाले, पक्षनेते राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ युवक काँग्रेसने आज वेगवेगळ्या प्रकारची दोनशे रोपटी नागरिकांना वितरीत करण्यात आली आहेत. काही रोपट्यांची लागवड करण्यात आली. यापुढे कुडचडे मतदारसंघातील युवक काँग्रेस अधिक कार्यक्षम करण्यासाठी मतदारसंघातील विविध विषय हातात घेणार आहे.

काँग्रेस नेते हर्षद गावस देसाई म्हणाले, की वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे मुलाप्रमाणे संगोपन होणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या स्थितीत निसर्गात होणारा बदल रोखण्यासाठी प्रत्यकाने आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा सरचिटणीस अली शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान किल्लेदार व इतर युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या