कुडणे येथे शिक्षकाने फुलविला भाजीचा मळा..!

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

 शिक्षक हे केवळ विद्या दानच करत नसतात तर आपण स्वतः वेगवेगळे उपक्रम राबवून स्वतःचा उत्कर्ष आणि इतरांना प्रोत्साहनही देत असतात.

साखळी:  शिक्षक हे केवळ विद्या दानच करत नसतात तर आपण स्वतः वेगवेगळे उपक्रम राबवून स्वतःचा उत्कर्ष आणि इतरांना प्रोत्साहनही देत असतात. पेशाने शिक्षक असलेले कुडणे  येथील संतोष मळीक यांनी कोरोना महामारीच्या प्रसंगी केलेल्या लाॅकडाऊनचा फायदा करून घेत आपल्या घराच्या बाजूला  स्वकष्टाने भाजीचा मळा फुलविण्याची किमया केली आहे.आणि ब-याच पैकी यशस्वी भाजीचे पीकही घेतले आहे.

 मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लाॅकडाऊन लागू झाल्याने घरातच बसून न राहता घरासमोरील जागेत मेहनत करून संतोष मळीक यांनी अनेक प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. यात तांबडी भाजी, दोडकी,भेंडी, चवळी, कारली, चीटकी, आळू , हळसांडे, वाल, झाडकणगी, हळद, काकडी आणि मिरची यांचा समावेश आहे. श्री मळीक भातशेतीही करतात. केरसुण्या बनविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. विविध कलांनी ते युक्त आहेत. गेली पंचवीस वर्षे त्यांनी पत्रकारिताही केली आहे. लेखनाचाही त्यांना छंद आहे.अनेक कार्यक्रमातही ते सहभागी होत असतात. सकाळी नित्यनियमित तब्बल पाच कि.मी चालण्याचा व्यायाम, सकाळी शिक्षकी पेशातील नोकरी व संध्याकाळी फावल्या वेळेत स्वता शेतीही करतात ते घरी कधीच स्वस्थ बसत नाहीत.
मळीक यांनी गुलाबाची बाग हटवून  भाज्यांची लागवड ‌केली आहे.

कोरोणा विशाणूमुळे मानव जातीला संभवलेल्या धोक्यामुळे भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नक्कीच जाणवेल हे गृहीत धरून मळीक यांनी आपल्या घराच्या समोर असलेली विविध रंगांच्या गुलाबांची बाग हटवून त्या जागेवर भाजीचा मळा फुलवीला आहे. कधीही व कोठेही लावता येतील पण जीवनावश्यक असलेली भाजी योग्य वेळी लावल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो या हेतूने त्यांनी हे काम केले.  या कामी त्यांना त्यांच्या पत्नीचे सहकार्य लाभले आहे. असेही त्यांनी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या