कुंडई गणेश मंडळातर्फे यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल

Kundai Ganesh Mandal has organized cultural programs this year
Kundai Ganesh Mandal has organized cultural programs this year

खांडोळा, 

कुंडई येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे ‘कोविड-१९’च्या संकटामुळे प्रतिकारात्मकरीत्या अत्यंत साधेपणाने ‘गणेशोत्सव २०२०’ साजरा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मंडळाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत एकमत झाल्याची माहिती मंडळाचे नूतन अध्यक्ष उमेश नाईक यांनी दिली.
मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत विविध कार्यक्रमांवर चर्चा होऊन सन २०२० ते २०२१ या काळासाठी समितीच्या अध्यक्षपदी उमेश धर्मा नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या सभागृहात विविध समित्यांची निवड व वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा आखण्यात आली.

निवडण्यात आलेली कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे - उपाध्यक्ष - रामदास सतरकर, सचिव - नागेश फडते, सहसचिव - लक्ष्मीकांत नाईक, खजिनदार - भालचंद्र गावडे, सहखजिनदार- प्रमोद फडते यांची निवड झाली. सदस्य म्हणून मोहन नाईक, प्रदीप शिरोडकर, विरेश कामत, प्रशांत फडते, रामू नाईक, शैलेश च्यारी, सुभाष म. नाईक, सुभाष की. नाईक, दिलीप नाईक, आनंद गोवेकर, महादेव परवार, लक्ष्मण जोशी, सिद्धार्थ सावंत, संजय भंडारी, विश्वास फडते, सागर गु. नाईक, परेश फडते, प्रमोद फडते, गौरेश फडते यांची निवड झाली. कार्यक्रम व प्रसिद्धी समितीवर शांतो गणेश नाईक अध्यक्ष , देवकृत्य समितीवर रामदास सतरकर तर विसर्जन समितीवर चुडू नाईक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
मंडळाच्या कार्यकारी समितीने मंजूर केलेल्या ठरावानुसार, यंदाचा गणेशोत्सव उत्सव कार्यकारी मंडळातर्फे सामाजिक अंतर राखून साजरा करण्यात येईल. श्रींची पूजा-अर्चा, आरती, नैवद्य आदी धार्मिक विधी ब्राह्मणांकरवी करून घेतले जातील. विसर्जना दरम्यान कोरोना संबंधित खबरदारी म्हणून मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे हे बंधनकारक राहील. ‘कोविड-१९’च्या संबंधित नियम व अटी यांच पालन काटेकोरपणे पाळण्यात मंडळाची जबाबदारी राहणार आहे.


सांस्कृतिक कार्यक्रमांची उणीव
कुंडई गणेशोत्सव मंडळातर्फे चतुर्थी काळात विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या कार्यक्रमामुळे गावातील विविध कलाकारांना संधी दिली जाते. शिवाय प्रत्येक नागरिकाला मंडळाच्या ठिकाणी योग्य मान देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदा ‘कोविड-१९’चे संकट असल्यामुळे हे सर्व कार्यक्रम होणार नसल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची उणीव भासणार आहे. 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com