कुंकळ्ळीच्या शिक्षण संस्था योग्य जागेच्या शोधात

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

राज्य सरकार कुंकळ्ळीला शैक्षणिक हब करण्याबाबत खरोखरच गंभीर आहे की सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी अशी घोषणा वारंवार करीत आहे असा प्रश्न स्थानिक विचारीत आहेत.माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही वर्षांपूर्वी अशी घोषणा केली होती त्याच्या नंतर पर्रिकरांना आपले राजकीय गुरू मानणारे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानीही अशीच घोषणा केली होती

कुंकळ्ळी: राज्य सरकार कुंकळ्ळीला शैक्षणिक हब करण्याबाबत खरोखरच गंभीर आहे की सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी अशी घोषणा वारंवार करीत आहे असा प्रश्न स्थानिक विचारीत आहेत.माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही वर्षांपूर्वी अशी घोषणा केली होती त्याच्या नंतर पर्रिकरांना आपले राजकीय गुरू मानणारे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानीही अशीच घोषणा केली होती.मात्र एका एनआयटीमुळे कुंकळ्ळी शैक्षणिक हब बनू शकत नाही हे सरकारला व सत्ताधारी भाजपाला माहीत नाही की सरकार व राजकीय नेते केवळ पोकळ घोषणा करीत आहेत असा प्रश्न लोक विचारीत आहेत.

कुंकळ्ळी शिक्षण क्षेत्रात मागे नाही. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणा-या संस्था आहेत.कुकळ्ळीत सरकारी व अनुदानित व खासगी मिळून एकूण बारा प्राथमिक शाळा आहेत.यात पाच खासगी प्राथमिक शाळा आहेत तर इतर सरकारी शाळा आहेत.पाच माध्यमिक शाळा, दोन उच्च माध्यमिक शाळा व एक महाविद्यालय या भागात आहे.

बहुतांश शिक्षण संस्था खासगी अनुदानित शाळा असून या शिक्षण संस्था मधून प्राथमिक ते पदवी पर्यत सुमार सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.कुकलीतील तीन माध्यमिक शाळा, तीन प्राथमिक शाळा, दोन उच्च माध्यमिक शाळा व एक महाविद्यालय एक किलोमीटर परिसराच्या आत असून या शिक्षण संस्थाना योग्य साधन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी मूलभूत हक्कापासून वंचित राहत आहेत.शाळा व शिक्षण संस्थाच्या विस्तारासाठी जागा नसल्यामुळे या शिक्षण संस्थाची कुचंबणा होत आहे.

दुर्दैव म्हणजे विद्यार्थ्याना खेळण्यासाठी मैदान नाही.कार्यक्रम आयोजनासाठी शाळांकडे योग्य सभागृह नाही.प्रशस्त वाचनालय, प्रशस्त प्रयोग शाळा, मुलीसाठी कॉमन  रूम, ध्वज संचालन व सकाळच्या प्रार्थनेसाठी शाळांकडे जागा नाही.मुता-या व इतर सुविधाचे विचारूच नका.शिवाय हजारो विद्यार्थी एकाच ठिकाणी बाजारात शिक्षण घेत असल्यामुळे वाहतुकीवर विपरीत परिणाम हितो तो वेगळाच शिवाय या गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यताही मोठी आहे.

यावर उपाय म्हणून सर्व शिक्षण संस्था मुख्य बाजारापासून लांब नेण्याचा प्रस्ताव काही शिक्षण संस्थानी सरकारकडे ठेवला होता.कुंकळ्ळीत गृहनिर्माण मंडळाची सुमार दीड लाख चौ. मी.जागा विनावापर पडून आहे ही जागा शिक्षण संकुल उभारण्यासाठी सरकारने द्यावी अशी मागणी कुंकळ्ळी शिक्षण संस्थेने केली होती.गृहनिर्माण मंडळाने या प्रस्तावाला सहमती दिली नाही.कुंकळ्ळीकराचीच ही जागा सरकारने अल्प मोबदल्यात संपादन केली होती.सरकारने कुंकळ्ळीत सरकारी प्रकल्पासाठी लाखो चौ. मी जागा संपादित केली आहे मात्र सरकार शिक्षणाच्या विकासासाठी स्वताकडील जमीन देण्यास तयार नाही मग शैक्षणिक हब निर्माण करण्याचा दावा फोल ठरत नाही का?असा प्रश्न लोक विचारीत आहेत.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनाही या संदर्भात शिक्षण संस्थेने निवेदन सादर केले असून मुख्यमंत्री खरोखरच कुकळलीला शैक्षणिक हब निर्माण करण्याबाबत गंभीर असेल तर सदर सरकारी जमिनीवर शाळा संकुल उभारण्यास सरकारने चालना द्यावी अशी मागणी स्थानिक शिक्षण संस्था करीत आहेत.

संबंधित बातम्या