मडगाव अपडेट: कुरवपूर वारी पुढे ढकलली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

मुगाळी-कुडतरी येथील श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानतर्फे दरवर्षी आयोजिक करण्यात येणारी कुरवपूर वारी पुढे ढकलण्यात आली आहे.

मडगाव: मुगाळी-कुडतरी येथील श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानतर्फे दरवर्षी आयोजिक करण्यात येणारी कुरवपूर वारी पुढे ढकलण्यात आली आहे. यंदा 17 एप्रिल रोजी ही वारी निश्चित करण्यात आली होती. 

महाराष्ट्र व कर्नाटकात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही वारी पुढे ढकलण्यात आल्याचे देवस्थान समितीने कळवले आहे. कर्नाटक तेलंगणच्या सीमेवर असलेल्या कुरवपूर येथे दरवर्षी काढण्यात येणाऱ्या वारीत गोव्यीतल हजारो भाविक सहभागी होतात. गुरु माऊली पांडुबाबा यांनी 46 वर्षांपूर्वी ही वारी सुरु केली होती. पुढे ढकलण्यात आलेल्या वारीची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे देवस्थान समितीने कळवले आहे. 
 

गोवा विधानसभा: दलबदलू 10 आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवर सभापती देणार निवाडा 

संबंधित बातम्या