ओला-सुखा कचरा वेगळा न केल्यास कुठ्ठाळी ग्रामसभा नागरिकांना करणार दंड

या पुढे कचरा (waste) वेगळा करून न देणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव या सभेत संमत झाला. तसेच पंचायत बाजार प्रकल्पाबाबतही एक विशेष बैठक घेण्याचे ठरले.
ओला-सुखा कचरा वेगळा न केल्यास कुठ्ठाळी ग्रामसभा नागरिकांना करणार दंड
कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उपस्थित आमदार एलिना साल्ढाणा.बाजूस कुठ्ठाळी ग्रामपंचायतीचे सरपंच व पंच सदस्यDainik Gomantak

ओला व सुखा कचरा (Wet- dry waste) वेगळा करून न देणाऱ्या नागरिकांकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा ठराव कुठ्ठाळी ग्रामसभेने (Kutthali Gram Sabha) संमत केला आहे. तसेच मोबाईल (Mobile) टॉवरबाबत माहिती जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण करण्याचा निर्णय झाला. याव्यतिरिक्त पंचायत क्षेत्रातील जे बेकादेशीर हातगाडे, पान-तंबाकू दुकाने, मटका सारख्या प्रकारांना बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

महसुलाच्या रूपाने पंचायतीला औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणारा निधी योग्यप्रमाणे मिळत नसेल तर माहिती हक्कानुसार माहिती मिळवून योग्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सचिव सचिन नाईक, कुठ्ठाळीच्या आमदार एलीना साल्ढाणा, सरपंच सेनिया परेरा, उपसरपंच सांतान गामा, पंच रेमंड डिसा, प्रताप नाईक, आंजेला फुरतादी उपस्थित होते.

 कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उपस्थित आमदार एलिना साल्ढाणा.बाजूस कुठ्ठाळी ग्रामपंचायतीचे सरपंच व पंच सदस्य
कुठ्ठाळी मतदारसंघातही जनमन उत्सवाचे स्‍वागत

सरपंच परेरा म्हणाल्या, पंचायतीने कोणत्याही बेकायदा कामांना परवानगी दिलेली नाही. असे असल्यास आपल्या निदर्शनास आणून द्यावे व विकासकामे राबविण्यात योग्य सहकार्य करावे. सर्वानुमते बेकायदा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीने थारा न देण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी जैविक विविधता या विषयावर आवश्यक माहिती तज्ज्ञ सौ. शारलिटा यांनी दिली. यावर मत व्यक्त करताना आमदार श्रीमती एलिना सालढाणा म्हणाल्या, कुठ्ठाळीतील जैवीक ठिकाण शोधून तिथे उपलब्ध असलेल्या प्रकाराची नोंद घेऊनअभ्यास करावा. पंचायत सचिव सचिन नाईक यांनी गतवर्षीचा जमाखर्च, अंदाज पत्रक सादर केले.

कुठ्ठाळीत सध्या सुरू असलेल्या वीज भूमीगत वाहिन्याचे काम लवकर पूर्ण करून घेण्याची विनंती करण्यात आली. पाजेतार येथील उभारण्यात आलेल्या टॉवरबाबत त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता मिळाली आहे. याबाबत पंचायतीने आवश्यक ती कारवाई केली आहे. अशावेळी केवळ पंचायतीलाच ग्रामस्थांनी दोष देणे बरोबर होणार नाही, असे सरपंच म्हणाल्या.

 कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उपस्थित आमदार एलिना साल्ढाणा.बाजूस कुठ्ठाळी ग्रामपंचायतीचे सरपंच व पंच सदस्य
गोव्यात वर्षभरानंतर भरणार ग्रामसभा

भविष्यात पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार असून, याबाबत योग्य काळजी घ्यावी. कचरा व्यवस्थापन योग्यप्रकारे हाताळला जात नसल्याने पंचायतीने काळजी घेतली पाहिजे, असे ग्रामस्थांनी सूचविले, अॅड. टामी कार्वोलो, सारथो कार्वोलो, केनडी परेरा, जूड परेरा, ज्योकिम फर्नांडिस, श्रीराम नाईक, आदित्य सुलंकर, ॲन्थोनी आनाकलेत रॉड्रिगीस यांनी चर्चेत भाग घेतला.

रविवारी झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. पंचायत घराघरातील कचरा कंत्राटदारामार्फत उचलत असली तरी नागरिक ओला आणि सखा कचरा वेगळा करून देत नाहीत. त्यामुळे या पुढे कचरा वेगळा करून न देणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव या सभेत संमत झाला. तसेच पंचायत बाजार प्रकल्पाबाबतही एक विशेष बैठक घेण्याचे ठरले. मोबाइल टॉवर' उभारण्याच्या विषयावरून काहींनी आरोग्य व इतर काही प्रश्न उपस्थित केल्याने तज्ज्ञांना बोलवून याबाबत माहिती जाणून घेण्याचे ठरले. या बैठकीत इतर काही विषयांवर चर्चा झाली. यावेळी सरपंच सेनिया परेरा व इतर पंच तसेच आमदार एलिना साल्ढाणा यांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com