गोव्यात कार अपघातात किर्गिझस्तानच्या महिलेचा गुदमरून मृत्यू

Dainik gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

शिवोली,  : गोव्यातील हडफडे येथे मुख्य रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री भरधाव कारगाडी रस्ता सोडून ओहोळात पडल्याने कारचालक आलियाना आबिकीवा (३८ ) या किर्गिझस्तानच्या महिलेचा गाडीतच गुदमरून बसल्याजागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हणजुणचे पोलिस पथक उपनिरीक्षक कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अपघाताचा पंचनामा केला. 
दरम्यान, मृत आलियानाचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवून देण्यात आला असून या अपघाताची माहिती किर्गीस्तानच्या दुतावासाला कळविण्यात आल्याचे उपनिरीक्षक कोरगावकर यांनी सांगितले. 
दरम्यान, आलियाना आबिकीवा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कारगाडीने कळंगुटहून हणजुणच्या दिशेने भरधाव वेगाने येत असता हडफडे येथील सॉल्ट रेस्टॉरंट परिसरात पोहोचताच आलियानाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याशेजारच्या माडाला त्यांच्या गाडीची जोरदार धडक बसली यावेळी धडक बसताच गाडी जवळच्या ओहोळात कोसळली, यावेळी स्टेरिंगवर असलेल्या आलियानाच्या नाका तोंडात ओहोळातील पाणी घुसल्याने गाडीतच तिचा गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लागू असतानाही कळंगुट-बागा तसेच हणजूण वागातोरच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात विदेशी लोकांची वर्दळ असते, रात्री अपरात्री बेफाम वाहने हाकणाऱ्या अशा विदेशी लोकांपासून स्थांनिकांच्या जीवीतास धोका असल्याने याभागात रात्रीची गस्त वाढविण्याची वारंवार मागणी स्थानिकाकडून करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्यावेळीही अपघातात कारचालकाचा ताबा सुटल्याने कारगाडी येथील ओहोळात कोसळली होती.

दरम्यान, आलियाना आबिकीवा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कारगाडीने कळंगुटहून हणजुणच्या दिशेने भरधाव वेगाने येत असता हडफडे येथील सॉल्ट रेस्टॉरंट परिसरात पोहोचताच आलियानाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याशेजारच्या माडाला त्यांच्या गाडीची जोरदार धडक बसली यावेळी धडक बसताच गाडी जवळच्या ओहोळात कोसळली, यावेळी स्टेरिंगवर असलेल्या आलियानाच्या नाका तोंडात ओहोळातील पाणी घुसल्याने गाडीतच तिचा गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लागू असतानाही कळंगुट-बागा तसेच हणजूण वागातोरच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात विदेशी लोकांची वर्दळ असते, रात्री अपरात्री बेफाम वाहने हाकणाऱ्या अशा विदेशी लोकांपासून स्थांनिकांच्या जीवीतास धोका असल्याने याभागात रात्रीची गस्त वाढविण्याची वारंवार मागणी स्थानिकाकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या