Goa Job Fair
Goa Job FairDainik Gomantak

Goa Mega Job Fair: ''रोजगार मेळाव्यात 18 हजार युवक भविष्य आजमावतील''

राष्ट्रीय आंतरारष्ट्रीय स्तरावरील कंपन्या होणार सहभागी

राज्यातील युवकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे गोवा सरकार रोजगार मेळावा कार्यक्रम एक ऐवजी दोन दिवस घेणार आहे. या मेळाव्यामध्ये सुमारे 14 हजार युवकांनी आपली नोंदणी केली असल्याची माहिती कामगार आयुक्तांनी दिली आहे.

(Labor Commissioner informed 18 thousand youths have registered in Goa Mega Job Fair)

गोवा राज्यात 8 आणि 9 नोव्हेंबर या दोन दिवशी मेळावा आयोजित केला जाणार आहे. यावर बोलताना कामगार आयुक्त राजू गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत सुमारे 14 हजार युवकांनी आपली नोंदणी या रोजगार मेळाव्यासाठी केली आहे.

आजचा दिवस नोंदणीसाठी बाकी असल्याने या मेळाव्यासाठी सुमारे 18 हजार युवक आपली नोंदणी करीत भविष्य आजमावतील अशी शक्यता कामगार आयुक्तांनी व्यक्त केली आहे. युवकांचा प्रतिसाद पाहून एक दिवस असणारा मेळावा आता दोन दिवस केला आहे.

Goa Job Fair
Vijai Sardesai : ...म्हणून मुख्यमंत्री सावंतांना 'मोपा'च्या उद्घाटनाची घाई; विजय सरदेसाईंचा थेट निशाणा

या मेळाव्यासाठी युवकांना ठिकाण आणि वेळ यांची माहिती नोंदणीनंतर दिली जाणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे युवकांना दिलेल्या वेळेत या मेळाव्यात आपला सहभाग नोंदवत भविष्य आजमावता येणार आहे.

Goa Job Fair
Goa News: झाडावरून पडल्‍याने केरीत एकाचा मृत्‍यू

नोंदणी केलेल्या युवकांना मिळणार मोबाईलवर अपडेट

गोवा सरकारने आयोजित केलेला रोजगार मेळावा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदान, तालेगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम महत्वाचा असून, अनेकांना त्यांचा फायदा होणार आहे.

या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार असल्याचं कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी म्हटले आहे. तसेच युवकांना वेळसह सर्व अपडेट मोबाईलवर कळणार असल्याने युवकांचा त्रास काहीसा कमी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com