Margao News: मडगाव येथे विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

विद्युत प्रवाह भारीत असलेल्या वस्तूच्या संपर्कात आल्याने झाला मृत्यू
Death Body
Death Body Dainik Gomantak

Margao News मडगाव येथील मुख्य बाजाराच्या ठिकाणी जुन्या भाटीकर हायस्कुल जवळ विजेचा धक्का लागून एकाचा अज्ञात युवकाचा मृत्यू होण्याची घटना घडली. हा मयत युवक या ठिकाणी कचरा गोळा करण्याचे काम करीत होता.

या दरम्यान विद्युत प्रवाह भारीत असलेल्या वस्तूच्या संपर्कात आला आणि तात्काळ त्याच ठिकाणी त्याचे निधन झाले. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली.

या विषयी माहिती प्राप्त झाल्यानंतर विद्युत खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन त्या परिसराची तपासणी केली असता येथील काही परिसर विद्युत भारीत असल्याचे त्यांना कळून आले.

Death Body
Amthane Dam: धक्कादायक! आमठाणे येथे महिलेवर मगरीचा हल्ला, कपडे धुताना खेचले धरणात

कचरा गोळा करणाऱ्या मयत इसमाचा संपर्क विद्युत प्रवाहाने भारित असलेल्या एका वास्तूशी आला असल्याचे एका वीज विभागीय अभियंत्याने सांगितले आणि हा प्रवाह 24 तास सलग सुरूच होता असेही तो म्हणाला .

या विषयावर बोलताना स्थानिक माजी नगरसेवक दामोदर नाईक यांनी सांगितले की आपण नगरसेवक असताना येथील साईन बोर्डच्या परवानगीची तपासणी करण्याची विनंती तत्कालीन मुख्यधिकारी याना केली होती बेकायदेशीर साइन बोर्ड हटविण्यात आले होते.

Death Body
Bicholim : धबधबा खाण खंदकातील पाणीउपसा सुरू

तसेच मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी ही येथील साईन बोर्ड काधण्याविषयीची मागणी केली आहें . तर या पुढे विद्युत प्रवाहित असलेल्या साईन बोर्डानं परवानगी देताना विद्युत अभियंत्यांकडून त्या बोर्डच्या वायरींची तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे .

या ठिकाणी काही आस्थापनांनी वीज पोल वरून थेट ओक कनेक्शन घेतले असून ते अनधिकृत व बेकायदेशीर आहे याचीही तपासणी करण्यात यावी अशी मागणी काहीजणांनी केली आहे.

Death Body
Goa Congress: गोवा सरकार ‘मिशन टोटल कमिशन’ मध्ये सामील, CCI ला लिहणार पत्र - काँग्रेस

दुकानदाराची चूक

येथील एका दुकानदाराची वीजेची तार  त्या ठिकाणी जमीनीवरच पडली होती. त्या मजुराचा पाय त्यावर पडला आणि त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यानी याची गंभीर दखल घेतली.

त्यानी सांगितले की यात वीज खात्याची काहीही चूक नसुन वीजेचे पॅनल ठीकठाक होते. त्यानी नंतर वीज खात्याच्या अभियंत्याशी संपर्क साधला व  त्या दुकानदाराला नोटीस पाठविण्याचे आदेश दिले. या नोटीसची प्रत पोलिसांना सुद्धा पाठविण्यास सांगितले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com