उत्तरप्रदेश, झारखंडला रेल्वेतून मजूर रवाना

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

गोव्यातून सोमवारी उत्तरप्रदेश, झारखंड राज्यातील मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली. उत्तरप्रदेशला १४८४ मजूर आपल्या निघाले, तर झारखंडसाठी सुमारे १४९४ मजूर मिळून १९७८ मजूर आज रेल्वेने निघाले., अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. यातील एक मडगाव व दुसरी करमळी रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आली.

मडगाव ः मूळगावी जाण्यासाठी रेल्वेस्‍थानकाकडे जाणारा मजूर वर्ग. (सोयरू कोमरपंत)

नावेली

गोव्यातून सोमवारी उत्तरप्रदेश, झारखंड राज्यातील मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली. उत्तरप्रदेशला १४८४ मजूर आपल्या निघाले, तर झारखंडसाठी सुमारे १४९४ मजूर मिळून १९७८ मजूर आज रेल्वेने निघाले., अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. यातील एक मडगाव व दुसरी करमळी रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आली.
सोमवारी दिल्ली ते तिरूअनंतपुरम राजधानी एक्सप्रेसमधून ९ प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर उतरले, तर ४१ प्रवासी मडगाव स्थानकावरून केरळला गेले. सुरतकल (कर्नाटक) ते मडगाव रेल्वेमधून १७१ रेल्वे कर्मचारी मडगाव स्थानकावर आले. त्यांची तपासणी करून त्यांना सेवेत रुजू करून घेतले जाणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले. दिल्ली ते तिरूअनंतपुरम राजधानी एक्सप्रेसमधून ९ प्रवासी मडगाव स्थानकावर उतरले असून यात सिआरपीएफच्या ३ जवानांचा समावेश होता. त्याच्याही हातावर क्वारंटाईनचा शिक्का यावेळी मारण्यात आला. यावेळी अधिकारी अजित पंचवाडकर उपस्थित होते.
अजूनही मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या मुळगावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वेची वाट पहात आहेत. बिहार राज्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मडगावात नावेली येथे मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये असून आपल्या मुळगावी जाण्यासाठी रेल्वेची वाट पहात आहेत.
बिहार, मध्यप्रदेश जाण्यासाठी आजही मजूर मडगावात आहेत. श्रमिक रेल्वे २८ मे पर्यंतच सोडण्यात येणार असून त्यानंतर रेग्युलर रेल्वे सुरू होणार आहेत, असे घाटगे यांनी सांगितले.

goa goa goa

संबंधित बातम्या