तीन वर्षांच्या मुलासमोर मजुराने घेतला गळफास

त्यावेळी खोलीत असलेल्या बसवराजच्या तीन वर्षीय मुलाने तब्बल आठशे मीटर अंतरावरील इमारत बांधकामावर असलेल्या आपल्या आईला ओढत घटनास्थळी नेले
तीन वर्षांच्या मुलासमोर मजुराने घेतला गळफास
labour suicide in front of 3 year old boy Dainik Gomantak

शिवोली: सोरांटवाडा-हणजूण येथे मजूर वस्तीत राहाणारा बसवराज ईराप्पा हडाफथ (24) या कर्नाटकातील मजुराने काल बुधवारी दुपारी तीन वर्षाच्या मुलासमोरच भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

labour suicide in front of 3 year old boy
Goa: राज्यात मिरीचे उत्पादन घटणार

ही घटना घडली, त्यावेळी खोलीत असलेल्या बसवराजच्या तीन वर्षीय मुलाने तब्बल आठशे मीटर अंतरावरील इमारत बांधकामावर असलेल्या आपल्या आईला ओढत घटनास्थळी नेल्याने हे प्रकरण उजेडात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी दिली. सोरांटवाडा हणजुणेत एका इमारतीच्या बांधकामावर आपल्या दोघा नणंदांसह बसवराजची पत्नी काम करत होती. सध्या बेरोजगार असलेल्या बसवराजने राहात्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हणजूण पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे.

labour suicide in front of 3 year old boy
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दोन दिवस गोवा दौरा..

बायणा येथे नवविवाहितेची आत्महत्या

बायणा येथील एका नवविवाहितेने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या विवाहितेचे नाव आकांक्षा आनंद पार्सेकर (30) असून ती पतीसमवेत बायणा येथे हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहात होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com