Government Scheme: ‘लाडली लक्ष्‍मीं’ना मारहाण!

गोवा सरकारच्या ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे अर्ज मंजूर करण्‍यासाठी खटपट करणाऱ्या युवतींना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.
 womens Beating |Government Scheme
womens Beating |Government SchemeDainik Gomantak

Government Scheme: एका राजकीय कार्यकर्ता महिलेने गोवा सरकारच्या ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे अर्ज मंजूर करण्‍यासाठी खटपटी केल्या खऱ्या, पण त्‍यासाठी मागितलेले पैसे न मिळाल्‍याने लाभार्थी युवतींना मारहाण करण्याचा प्रकार बाबल्याखळी, नागझर-कुर्टी येथे घडला.

या मारहाणीत एक युवती जखमी झाल्याने तिला उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी घडली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, बाबल्याखळी येथे या कार्यकर्त्या महिलेचा वावर असून तेथील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन युवतींना ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे पैसे मंजूर करवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करते,

 womens Beating |Government Scheme
Smart City: ‘स्मार्ट’ शहरांमुळे जीवनमान उंचावेल -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मात्र त्या बदल्यात एक लाखातील 50 हजार रुपये मला द्यावे लागतील, असा सौदा केला. त्‍यास त्या दोघीही तयार झाल्या. पण पैसे मंजूर झाल्यानंतर या दोन्ही लाभार्थींपैकी एकीने 20 हजार तर दुसरीने 30 हजार रुपये या कार्यकर्ता महिलेला दिले. पण हा सौदा त्‍या महिलेस मान्‍य नव्‍हता.

दरम्‍यान, या प्रकारामुळे फोंड्यातच नव्‍हे तर संपूर्ण राज्‍यात खळबळ माजली आहे. अशा प्रकारे पैसे घेऊन सरकारच्‍या तोंडाला पाने फुसली जात आहेत, अशा अर्चेला आता तोंड फुटले आहे.

 womens Beating |Government Scheme
Mahadayi Water Dispute: म्हादई आंदोलनात असलेल्‍यांची गळचेपी ?

एक युवती जखमी; इस्‍पितळात दाखल

उर्वरित पैसे देण्यासाठी या महिलेने त्या दोन्ही लाभार्थींकडे तगादा लावला. शेवटी पैसे मिळत नसल्याने ही महिला संतापली व तिने दोन्ही लाभार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी भांडण उकरून काढून त्यांना मारहाण केली.

यात एक लाभार्थी युवती जखमी झाली. तिला फोंडा आयडी इस्पितळात दाखल करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्‍यान, या प्रकरणी लाभार्थी युवतींच्‍या कुटुंबीयांनी फोंडा पोलिसांत धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com