Land Grabbing Case: जमीन हडप प्रकरणी राजकुमार मैथीला तिसऱ्यांदा 'अटक'

Land Grabbing Case: या प्रकरणात पहिल्यांदा 19 ऑगस्टला, तर दुसऱ्यांदा 6 सप्टेंबरला अटक झाली होती.
Goa Crime Case
Goa Crime CaseDainik Gomantak

Land Grabbing Case: राज्यात खळबळ माजवून दिलेल्या जमीन हडपप्रकरणी विशेष तपास पथकाने आज राजकुमार ऊर्फ राजू मैथी याला तिसऱ्या प्रकरणामध्ये अटक केली. यापूर्वी त्याला दोन प्रकरणांत अटक करण्यात आली होती. त्यामध्ये त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे.

संशयित मैथी याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या जमीन हडप प्रकरणातील विविध तक्रारींमध्ये मास्टरमाईंड असलेल्या संशयितांची नावे समोर येत असल्याने त्यांना अटक केली जात असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

Goa Crime Case
Goa Police अधिकाऱ्यांची समन्वय बैठकीत कडक भूमिका; ड्रग्‍स तस्करीविरोधात व्यूहरचना

सध्या एसआयटीकडे जमीन हडपप्रकरणाच्‍या तक्रारी येत असून त्यांची संख्या सुमारे 200 वर गेली आहे. प्रत्येक प्रकरणाची माहिती मिळवण्यास विलंब होत आहे. त्याची ठोस माहिती महसूल खात्याकडून मागण्यात येत आहे. त्याची पडताळणी केल्यानंतरच गुन्हा नोंद केला आहे.

अटक केलेल्या संशयित मैथी याने बनावट दस्तावेज तयार करून जमिनी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून काही जमिनींची विक्री केली आहे. त्याला पहिल्यांदा 19 ऑगस्टला, तर दुसऱ्यांदा 6 सप्टेंबरला अटक झाली होती.

Goa Crime Case
Goa Police: बढती मिळाली, पण पुढे काय? अधिकाऱ्यांना लागली कार्यभाराची प्रतीक्षा

दस्तावेज नसल्‍याने विलंब-

दरम्यान, सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनींचे मालक शोधून त्या जमिनी त्यांच्या ताब्यात देण्यासाठीच्या चौकशीसाठी एक सदस्यीय निवृत्त न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे व त्याची चौकशी सध्या सुरू आहे. काही प्रकरणामध्ये जमिनीच्या दस्तावेजाची माहिती मिळण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे तपासाची गतीही मंदावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com