मेळावलीत जमीन सर्वेक्षण होणारच

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावलीत आय आय टी प्रस्तावित प्रकल्पासाठी जमीन सर्वेक्षण सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात पत्रकारांना सांगितले.

पणजी: सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावलीत आय आय टी प्रस्तावित प्रकल्पासाठी जमीन सर्वेक्षण सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात पत्रकारांना सांगितले. मेळावलीत काल जमावाने आक्रमक होत पोलिस व जमीन सर्वेक्षकांना पिटाळून लावले होते. 

मुख्यमंत्र्यांना आज याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले तेथील लोकांना चर्चेसाठी या असे मी निमंत्रण दिले आहे. चर्चेसाठी सरकारचे दरवाजे खुले आहेत. मी सरकारची भूमिका तिथे जाऊन मांडली आहे. हा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो. आयआयटी प्रकल्प राज्याला हवा आहे त्याचबरोबर सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, मात्र सर्व काही चर्चेतून पुढे आले पाहिजे. लोक प्रकल्पाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.

आणखी वाचा:

गोवा लोकायुक्तांकडून माजी सरपंचाविरोधात तक्रार दाखल -

संबंधित बातम्या