गोवा रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मातीच्या ढीगाऱ्यांत दबली ट्रेन; पाहा VIDEO

घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rain) ही दरड कोसळून माती रुळावर आल्याने हा अपघात घडल्याचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे.
गोवा रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मातीच्या ढीगाऱ्यांत दबली ट्रेन; पाहा VIDEO

मडगाव: गोव्याजवळ कर्नाटक हद्दीत सोनावळी येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्याने काल सकाळी मुंबईला जाणाऱ्या मंगळुरू- मुंबई स्पेशल ट्रेनचे इंजिन आणि एक डबा रुळावरून घसरल्याने आधीच पावसामुळे विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी ठप्प झाले होते. या घटनेनंतर कोंकण रेल्वे मार्गावरील 5 तर दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील 1 अशा 6 गाड्या रद्द करण्यात आल्या. काल सकाळी 6.20 च्या दरम्यान ही घटना घडली असे रेल्वेच्या सूत्रांकडून माहिती मिळाली. घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rain) ही दरड कोसळून माती रुळावर आल्याने हा अपघात घडल्याचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे.

गोवा रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मातीच्या ढीगाऱ्यांत दबली ट्रेन; पाहा VIDEO
गोवा-कर्नाटक रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेचे इंजिन घसरले

चांगली बातमी ही आहे की या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. ही गाडी नंतर कुळे रेल्वे स्थानकावर आणून ठेवली व गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बसमधून मडगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. रत्नागिरीत वाशिष्ठी नदीला पूर येऊन रेलमार्ग पाण्याखाली गेल्याने कोंकण रेल्वे मार्गावरील गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एका गाडीला हा अपघात घडला.

गोवा रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मातीच्या ढीगाऱ्यांत दबली ट्रेन; पाहा VIDEO
Goa Covid-19: सांग सांग भोलानाथ, कोरोना जाईल काय?

हा पर्यायी मार्गही या अपघातामुळे बंद झाल्याने कोंकण रेल्वे मार्गरवरील मडगाव- मुंबई जनशताब्दी, एर्नाकुलम - निझमुद्दीन स्पेशल, निझमुद्दीन - एर्नाकुलम स्पेशल, मडगाव - एलटीटी स्पेशल व मंगळुरू - सीएसटी स्पेशल या पाच तर दक्षिण मध्य मार्गावरील वास्को- हावडा अशा 6 गाड्या रद्द करण्यात आल्या तर कोचुवेली - इंदूर साप्ताहिक रेल्वे राणींगुंटा- विजयवाडा- भोपाळ या मार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com