आगोंद-खोला रस्त्याजवळ पावसामुळे दरड कोसळली

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

आगोंद व खोल पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या साळेरी पुलाजवळ आगोंदच्या बाजूने डोंगराची दरड कोसळण्यास आरंभ झाला आहे. सध्या दगड व माती घसरण्यास सुरूवात झाली. 

काणकोण: आगोंद व खोल पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या साळेरी पुलाजवळ आगोंदच्या बाजूने डोंगराची दरड कोसळण्यास आरंभ झाला आहे. सध्या दगड व माती घसरण्यास सुरूवात झाली. 

आगोंद-खोला रस्त्याजवळील हा डोंगर असल्याने दरड कोसळून माती व दगड रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. दरड कोसळल्यानंतर आज सकाळी अभियंते वेर्णेकर यांनी बुलडोजर आणून दगड व माती बाजूला काढली. या ठिकाणी रस्त्याला तीव्र वळण आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला झाडे वाढली आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. 

सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत घसरण होत असलेला डोंगराचा भाग कापून काढावा त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची छाटणी करण्याची मागणी आगोंदचे सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी केली आहे. 

 

संबंधित बातम्या