मागील 10 दिवसात गोव्यात झपाट्याने वाढतीये अ‍ॅक्टिव रुग्णसंख्या

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कडक संचारबंदी लागू केल्‍यानंतर आज दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांची  संख्या घटली नाहीच.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कडक संचारबंदी लागू केल्‍यानंतर आज दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांची  संख्या घटली नाहीच. उलट आज दिवसभरामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 50 जणांना बळी गेला. गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 561 जणांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्‍या दहा दिवसांमध्ये 30 हजार 598 एवढे नवे कोरोनाबाधित  सापडले.  सरासरी 50 च्‍या संख्‍येने जाणाऱ्या बळींची संख्‍या रोखण्‍यासाठी सरकारकडूनही शर्थीचे प्रयत्‍न सुरू आहेत. आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार राज्यात चोवीस तासांत 6,107 कोरोना संशयितांची तपासणी करण्‍यात आली. त्यामध्ये 2804 नवे कोरोनाबाधित सापडले. दिवसभरामध्ये 2367 जण कोरोनावर उपचार घेत होते, त्‍यांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरी गेले. 

पर्रीकर असते तर गोव्यावर हे संकट आलंच नसतं

राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची एकूण संख्या 1729 वर पोहोचली आहे. आजच्या दिवशी राज्यांमध्ये सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 32 हजार 262 एवढी झाली आहे. राज्य सरकार कोरोना नियंत्रणासाठी अथक प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे आरोग्य खात्याच्या सर्व तज्‍ज्ञ डॉक्टरांना सोबत घेऊन विविध उपाययोजना करीत आहेत. तरीही नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. 

रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गोव्यात ‘कॉल सेंटर’ सुरू

मागील 10 दिवसातील अ‍ॅक्टिव रुग्णसंख्या

                 तारीख अ‍ॅक्टिव रुग्णसंख्या
     02/05/2021 24,607
     03/05/2021 25,839
     04/05/2021 26,731
     05/05/2021 27,964
     06/05/2021 29,752
     07/05/2021 31,716
     08/05/2021 32,387
    09/05/2021 31,875
    10/05/2021 32,262

दहा दिवसातील एकूण लेखाजोखा 

* 1 ते 10 मे पर्यंत  65 हजार 606 कोरोना नमुन्‍यांची तपासणी
* गेल्‍या दहा दिवसांमध्ये 30 हजार 598  नवे कोरोनाबाधित.

* 1 ते 10 मेपर्यंत कोरोनावर उपचार घेणारे 20 हजार 720 कोरोनाबाधितांच्‍या प्रकृतीत सुधारणा
* या दहा दिवसांत कोरोनामुळे 561 जणांचा बळी

 

संबंधित बातम्या