गोवा पालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख उद्या

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

राज्यातील सहा पालिका, एक महापालिका निवडणुकीसाठी तसेच नावेली जिल्हा पंचायत, पंचायतीच्या 22 प्रभागांसाठी तसेच साखळी पालिकेच्या प्रभाग 9 च्या पोटनिवडणुकीसाठी आज 505 उमेदवारी अर्ज छाननी.

पणजी: राज्यातील सहा पालिका, एक महापालिका निवडणुकीसाठी तसेच नावेली जिल्हा पंचायत, पंचायतीच्या 22 प्रभागांसाठी तसेच साखळी पालिकेच्या प्रभाग 9 च्या पोटनिवडणुकीसाठी आज 505 उमेदवारी अर्ज छाननी अंतीम पात्र ठरविण्यात आले. कुंकळ्ळी पालिकेतील प्रभाग 1 मधील श्रावणी सत्यविजय कांबळी हिचा उमेदवारी अर्ज छाननीवेळी फेटाळण्यात आला. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याला स्थगिती दिल्याने मुरगाव, मडगाव, केपे, सांगे व म्हापसा पालिकांसाठी स्थगित केलेली निवडणूक प्रक्रिया सुरू करून आजपर्यंत 208 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या पालिकांसाठी उद्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.

मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार 

संबंधित बातम्या