गेल्या दोन दिवसात गोव्यातील थंडी वाढली

The last two days have been cold in Goa temperature is likely to decrease
The last two days have been cold in Goa temperature is likely to decrease

पणजी :  राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. गेल्या चोवीस तासात पारासुद्धा खाली आला आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्र अद्यापही खवळलेल्या अवस्थेत आहे. समुद्रावरील वातावरण वादळी असल्याने मासेमाऱ्यांनी समुद्रात उतरू नये, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, समुद्रानजीक जाताना नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय यासंदर्भात दृष्टीच्या सुरक्षारक्षकांनासुद्धा सतर्क करण्यात आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या चोवीस तासात कमाल ३३ अंश सेल्सिअस आणि किमान २२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. समुद्रावर वाऱ्याचा वेग चांगलाच वाढला असून हा वेग ४५ ते ५५ कि.मी. प्रती तास असा असणार आहे. वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यतासुद्धा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com