"स्व. मनोहर पर्रीकर राजकारणातील वादळ"

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

स्व. मनोहर पर्रीकर हे एक राजकारणातील वादळ होते. गोव्याच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी केलेले कार्य प्रत्येकाला आपले कार्य आहे असे जेव्हा वाटेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही गोव्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे चिज होईल.

पणजी: स्व. मनोहर पर्रीकर हे एक राजकारणातील वादळ होते. गोव्याच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी केलेले कार्य प्रत्येकाला आपले कार्य आहे असे जेव्हा वाटेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही गोव्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे चिज होईल, असे उद्‍गार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज काढले.

पत्रकार वामन प्रभू यांनी लिहिलेल्या `मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड` या पुस्तकाच्या हिंदी अनुवादीत आवृत्तीचे प्रकाशन केल्यानंतर नाईक बोलत होते. किशोर अर्जुन यांनी या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद केला आहे.  या पुस्तकाचा कोकणी व इंग्लिश भाषांमधून अनुवाद करण्याचा प्रभू यांचा मानस आहे.

स्व. पर्रीकर यांनी या देशाचे संरक्षणमंत्री म्हणून आपल्या कार्याचा अमीट असा ठसा उमटविला असून देशाबाहेरही त्यांचे कार्य पोहोचणे गरजेचे आहे. प्रभू यांनी पर्रीकरांवर हे पुस्तक लिहून खूप चांगले  काम केलेले आहे. ते निश्चिपणे अभिनंदनास पात्र आहेत, असे नाईक म्हणाले.

स्व.मनोहर पर्रीकर यांच्या कपाटांमध्ये सापडलेल्या वादग्रस्त ‘राफेल’ बाबत संशय दूर करा 

`पर्रीकरांचे कार्य सर्वदूर पोचावे, हा  हे पुस्तक लिहिण्यामागचा एकमेव हेतू आहे. हे पुस्तक पर्रीकरांवर आहे, पण श्रीपाद नाईक यांच्या शिवाय ते पूर्णच होऊ शकत नव्हते, असे प्रभू म्हणाले.

या पुस्तकाची प्रस्तावना स्व. सुरेंद्र सिरसाट यांनी लिहिली आहे. दुर्दैवाने ते हा क्षण बघायला आज हयात नाहीत. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रभू म्हणाले. या प्रसंगी युनायटेड असोसिएशन ऑफ व्हेटरनचे अध्यक्ष  व माजी सीपीओ राजीव गुप्ता, माजी पीओ अखिलेशकुमार शर्मा, माजी पीओ कृष्णा शरन सिंग, टी.एस. राणा, माजी एच.एल.टी. राजीवकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या