गोवा शिपयार्डमध्ये आज ‘जलावतरण’

अवित बगळी
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

गोवा शिपयार्ड लिमिटेड या संरक्ण मंत्रालयाच्या कंपनीमध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात येत असलेल्या अत्याधुनिक गस्ती जहाजाचे गुरुवारी (ता. १३) दुपारी अडीचवाजता ऑनलाइन माध्यमातून जलावतरण करण्यात येणार आहे.

पणजी
गोवा शिपयार्ड लिमिटेड या संरक्ण मंत्रालयाच्या कंपनीमध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात येत असलेल्या अत्याधुनिक गस्ती जहाजाचे गुरुवारी (ता. १३) दुपारी अडीचवाजता ऑनलाइन माध्यमातून जलावतरण करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे संरक्षणसचिव डॉ. अजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गोवा शिपयार्डचे जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांनी दिली. 
हा जलावतरण सोहळा वास्को येथील गोवा शिपयार्डमध्ये होईल. गोवा शिपयार्डने यापूर्वी तयार केलेली सहा अत्याधुनिक जहाजे भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. त्यानंतर आणखी पाच जहाजांचे कंत्राट गोवा शिपयार्डला मिळाले आहे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या