गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल‘ अभियानाची सुरुवात

प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), युवा कॉंग्रेसचे पदाधिकारी ॲड. गौतम भगत, विवेक डिसील्वा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल‘ अभियानाची सुरुवात
Goa Pradesh Youth CongressDainik Gomantak

पणजी: गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसतर्फे (Goa Pradesh Youth Congress) आज ‘यंग इंडिया के बोल ‘ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. गोवा युवा कॉंग्रेसचे सहप्रभारी मैनुद्दीन एच.जे. यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात आज पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयातून करण्यात आली. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), युवा कॉंग्रेसचे पदाधिकारी ॲड. गौतम भगत, विवेक डिसील्वा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मैनुद्दीन यांनी सांगितले की ‘यंग इंडिया के बोल ‘ अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्हा स्तरावर 18 ते 35 वयोगटाच्या युवांची बोलण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यातून प्रत्येकी ५ प्रवक्ते नेमण्यात येतील. त्या 10 मधून राज्यस्तरीय प्रवक्ते नेमले जातील. त्यानंतर देशपातळीवर ही स्पर्धा होईल.

Goa Pradesh Youth Congress
Goa Election: रेजिनाल्ड काँग्रेस मध्येच राहणार, वाढदिवशी घोषणा

गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसने तीन पदाधिकाऱ्यांना बढती दिली आहे. गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्‍हार्दोळकर यांनी पत्रकातून ही माहिती दिली आहे. यानुसार साईश आरोलकर व लेविता परेरा आंद्रादे यांना युवा कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी तर संदेश गावकर यांना युवा कॉंग्रसचे सचिव म्हणून बढती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.