आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट पद्धतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यात 16 वेगवेगळ्या ठिकाणी असे सिग्नल बसविण्यात आले आहेत
CM Launched Artificial Intelligence Driven Security
CM Launched Artificial Intelligence Driven SecurityDainik Gomantak

राज्यातांल वाहतूक व सुरक्षेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार गोव्यात प्रथमच अत्याधुनिक अशा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट पद्धतीचा वापर करत असून त्याचे आज उद्घाटन करण्यात आले.

प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मेरशी जंक्शन जवळ केले. या पद्धतीचा वापर बंगळुरूमध्ये करण्यात आल्याने तेथील 42 टक्के वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे. या प्रकल्पावर बेलटेक एआय कंपनी सरकारबरोबर पोपीपी मॉडेलवर काम करणार आहे.

CM Launched Artificial Intelligence Driven Security
दिल्ली पर्यटक हल्ला प्रकरण! पाचवा आरोपी अटक, गाडीवरून निघाला होता ऑफिसला एवढ्यात...

मेरशी जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने तसेच उत्तर व दक्षिणेकडून येथे वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे मुश्किलीचे होत होते. यावर सरकारने हा पर्याय काढला आहे.

दोन आठवडे मेरशी येथील वाहतुकीचा अभ्यास केल्यानंतर या कंपनीने या ठिकाणी 16 कॅमेरे बसविले आहेत. वाहनातील चालकाचेही चित्र या कॅमेऱ्यामध्ये कैद होण्याची सोय करण्यात आली आहे.

या ठिकाणी वाहनांना सुमारे 12 ते 15 मिनिटे थांबावे लागत होते ते आता ही वेळ या अत्याधुनिक यंत्रणेमुळे 4 ते 6 मिनिटांवर आली आहे. यापूर्वी वाहतूक पोलिस तैनात करण्यात येत होते, तेथे आता एकच पोलिस यावर नियंत्रण ठेवणार आहे.

एखादी रुग्णवाहिका किंवा अम्निशमन पाण्याचा बंब वाहनांच्या रांगेत असल्यास ही यंत्रणा आपोआप त्याचा शोध घेत त्यांना वाट करून देते. ही यंत्रणा या जंक्शनवरच नव्हे तर शहरातील इतर भागात वाहतुकीबाबतही माहिती देते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद या यंत्रणेत होते त्यामुळे आपोआपच ई-चलन तयार होते. हा सर्व डेटा त्वरित सेंट्रल कमांड व कंट्रोल सेंटर्सकडे उपलब्ध होतो. सिग्नलसाठी उभ्या असलेल्या वाहनांचा वेळ कमी झाल्याने धूर प्रदूषणही कमी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com