लवू यांचा MGP आणि TMC वर 'खळबळजनक' आरोप!

मगो नेते हे ‘लिडर’ नसून ‘डिलर’: लवू मामलेदार यांची ढवळीकर बंधूंवर सडेतोड टीका; एमजीपी आणि टीएमसी यांच्यात कोट्यवधींच्या कराराचा आरोप..
Goa Assembly Election: Lavoo Mamledar 'sensational' Allegations on MGP and TMC

Goa Assembly Election: Lavoo Mamledar 'sensational' Allegations on MGP and TMC

Dainik Gomantak

Goa Assembly Election: तृणमूल काँग्रेसशी मगो पक्षाने युती करून मोठे डील केले आहेत. मगोचे नेते स्वतःला लिडर समजतात मात्र ते डिलर बनले आहेत. त्यांनी 31जागा तृणमूल काँग्रेसला विकल्या आहेत. तृणमूल काँग्रेस गोव्यात प्रवेश करून स्क्रॅप जमा करत असे टीका करणारे मगो नेते आता स्वतःच व्होलसेल स्क्रॅप बनून या पक्षाशी युती केली आहे अशी परखड टीका हल्लीच तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकून बाहेर पडलेल्या लवू मामलेदार (Lavoo Mamledar) यांनी ढवळीकर बंधूंवर केली.

Goa Assembly Election: Lavoo Mamledar 'sensational' Allegations on MGP and TMC

गोव्यात धोक्याची घंटा; 8 वर्षाचा मुलगा ओमिक्रॉन बाधित!

तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला मदत करणारी ‘आयपॅक’ कंपनी ही गोव्यातील जनतेला मूर्ख बनवत असून त्यापासून सावध राहण्याचे आवाहन लवू मामलेदार यांनी करून ते म्हणाले, तृणमूल काँग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये सरकार असताना गृहलक्ष्मी योजना सुरू फक्त 500 रुपयेच देत आहेत मात्र गोव्यात महिलांची मते मिळवण्यासाठी महिलांना या योजनेखाली 5000 रुपयांचे आमिष दाखवले जात आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेस घरोघरी जाऊन महिलांना ही योजना देत नोंदणी करत आहेत. त्यांची सविस्तर माहिती नोंद करत आहे. अशी एखाद्याची व्यक्तिगत माहिती जमा करणे उल्लंघन आहे. या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी त्यापासूनही सावध राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Goa Assembly Election: Lavoo Mamledar 'sensational' Allegations on MGP and TMC

कला अकादमीचे काम कधी पूर्ण होणार?

मगो हा बहुजन समाजाचा पक्ष असे दाखवले जाते मात्र हल्लीच मगोचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी तृणमूल काँग्रेसशी युती करण्याचे कारण देताना सांगितले की, ढवळीकर बंधू ब्राम्हण व ममता बॅनर्जी (TMC Leader Mamata Banerjee) या सुद्धा ब्राम्हण समाजातील आहेत. त्यामुळे मगो बहुजन समाजाचा पक्ष सांगून हे ढवळीकर बंधू लोकांची दिशाभूल करत आहेत. भाजप हा भट - ब्राम्हणाचा तर काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असे ओळखले जाते. मागील 2017 च्या निवडणुकीत मगोने 8 उमेदवार उच्च समाजातील होते तर भाजप व काँग्रेसचे अनुक्रमे 4 व 1 होते. यावरून मगो हा जातीभेद करणारा पक्ष आहे. फक्त मतांसाठी त्यांना बहुजन समाजाचा कळवळा आहे. त्यामुळे बहुजन समाजाने मगो (MGP) व तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांना मते देताना विचार करावा व त्यांच्या भूलथापांना बळू पडू नये असे आवाहन त्यांनी केले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com