राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

 कळंगुट किनाऱ्यावर ज्यावेळी काहीच नव्हते, त्यावेळी ‘सोझा लोबो’ हे एकच रेस्टॉरंट होते. परवा रात्री दोन वाजता ५० परप्रांतीय गुंडांनी ते रेस्टॉंरंट पाडून टाकले. तेथून दोन मिनिटांवर पोलिस ठाणे आहे. तरीही पोलिस त्यांना पकडू शकत नाही यावरून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय आहे यावर प्रकाश पडतो, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

पणजी :   कळंगुट किनाऱ्यावर ज्यावेळी काहीच नव्हते, त्यावेळी ‘सोझा लोबो’ हे एकच रेस्टॉरंट होते. परवा रात्री दोन वाजता ५० परप्रांतीय गुंडांनी ते रेस्टॉंरंट पाडून टाकले. तेथून दोन मिनिटांवर पोलिस ठाणे आहे. तरीही पोलिस त्यांना पकडू शकत नाही यावरून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय आहे यावर प्रकाश पडतो, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, याविषयी पोलिसात रितसर तक्रार देऊनही पोलिस त्यांना पकडू शकत नाहीत यावरून अशा परप्रांतीय गुंडांना कळंगुटमध्ये किती अभय आहे हे दिसून येते. आज तक्रारीनंतर दुसरा दिवस केवळ एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणातील मुख्य सुत्रधारापर्यंत पोलिस अद्याप पोचलेले नाहीत. कोणीही कुठूनही यावे आणि कळंगुटमध्ये रहावे अशी स्थिती आहे. या साऱ्याला राजकीय आशीर्वाद असल्याने स्थानिकाचे रेस्टॉरंट मोडण्यापर्यंत अशा बाहेरून येऊन कळंगुटमध्ये राहणाऱ्यांची मजल जात आहे. सरकारला याचे काही पडून गेलेले नाही. सोनेरी समुद्र किनारा म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या कळंगुटचे नाव आता फोफावलेल्या गुन्हेगारीसाठी घेतले जाते याचे श्रेय सरकारनेच घ्यावे.

खंडणी, मारमाऱ्या, चोऱ्या हे नित्याचेच झाले आहे. पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर गुंड येऊन रेस्टॉरंट मोडले जाऊ शकते हे न पटणारे नाही. मंत्री मायकल लोबो योगायोगाने राज्याबाहेर आहेत. माजी सरपंच असलेल्या दांपत्याच्या रेस्टॉरंटच्या बाबतीत असे होऊ शकते तर सर्वसामान्‍यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमलीपदार्थ, देह विक्रय यामुळे कळंगुट बदनाम  होत आहे. संघटीत गुन्हेगारी कळंगुटमध्ये डोके वर काढत आहे याची दखल सरकारने घेतली पाहिजे. तसे न झाल्यास कळंगुटवासीयांचा संयम संपत आला आहे. त्यांच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी. यावेळी जनार्दन भंडारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या