भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा शिलान्यास : ब्रह्मेशानंदाचार्य

sanjay ghugretkar
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांनी धर्माचा विचार करून प्रत्येक हिंदू बांधवांच्या मनामध्ये देव, देश व धर्माची चळवळ निर्माण केली. ठिकठिकाणी रथयात्रा, कारसेवा, भारत माता पूजन, शिलापूजन अशी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून व हिंदू एकत्रिकरणातून आंदोलनाची तीव्रता वाढवली. श्रीराम मंदिर बनणे हा एकमेव निर्धार सद्‌गुरू ब्रह्मानंद स्वामी केला व कार सेवकांना घेऊन अयोध्येला गेले.

खांडोळा

 ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांनी धर्माचा विचार करून प्रत्येक हिंदू बांधवांच्या मनामध्ये देव, देश व धर्माची चळवळ निर्माण केली. ठिकठिकाणी रथयात्रा, कारसेवा, भारत माता पूजन, शिलापूजन अशी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून व हिंदू एकत्रिकरणातून आंदोलनाची तीव्रता वाढवली. श्रीराम मंदिर बनणे हा एकमेव निर्धार सद्‌गुरू ब्रह्मानंद स्वामी केला व कार सेवकांना घेऊन अयोध्येला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराचा झालेला शिलान्यास हा तर भारताच्या सांस्कृतिक गत वैभवाचा शिलान्यास आहे, असे मार्गदर्शन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्‌गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी केले.
बहुप्रतिक्षित अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर शिलान्यास विधी अनेक संत-महंतांच्या उपस्थितीत, देशाचे भाग्यवंत पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यानिमित्ताने तपोभूमी गुरुपीठावर आयोजित केलेल्या श्रीराम पूजन कार्यक्रमामध्ये पूज्य स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य मार्गदर्शन करीत होते.
तपोभूमी संस्थापक, राष्ट्रसंत ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य नेतृत्वाखाली श्रीराम मंदिर उद्‌गार कार्यासाठी आयोजित कार सेवा अभियानात गोव्याहून हजारों कार सेवक सहभागी झाले होते. याचे नेतृत्व राष्ट्रसंत सद्‌गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांनी केले होते. हजारो गोमंतकीयांनी या अभियानात सहभागी झाले होते.
यावेळी भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजप नेते सतीश धोंड, दामू नाईक, श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक अॅड्. ब्राह्मीदेवी, प्रा. रामचंद्र नाईक, धर्मसेवा प्रबंधक रामा टेमकर, श्री दत्त पद्मनाभ पीठ महाप्रबंधक शुभक्षण नाईक आदी उपस्थित होते. पौरोहित्य उपाध्याय सतीश यांनी केले. सकाळच्या सत्रात ब्रह्मवृंदांकडून रामनाम जप तसेच संध्याकाळी दीपप्रज्वलन करण्यात आले.

इतिहासात नोंद ःमुख्यमंत्री
श्रीराम मंदिराचे आंदोलन पूज्य ब्रह्मानंद स्वामी यांनी अयोध्येत जाऊन केले. जवळजवळ हजारोंच्या संख्येने कारसेवक पूज्य ब्रह्मानंद स्वामी यांना सान्निध्यात या आंदोलनात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते शिलान्यास विधी होत असताना पूज्य स्वामीजींच्या चरणी आदरांजली वाहणे आम्हासर्वांचे कर्तव्य आहे, त्यामुळे सद्‌गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींचरणी गोवा सरकारच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. राष्ट्रसंत ब्रह्मानंद स्वामींनी अयोध्येत केलेले नेतृत्व गोव्याच्या इतिहासात नोंद असेल, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

ब्रह्मानंद स्वामी यांचे स्वप्न साकार : आयुषमंत्री
ब्रह्मानंद स्वामीजींनी समस्त गोमंकातील हिंदूंना एकत्रित करून, रामजन्मभूमी निर्माणार्थ असलेली चळवळ तळागाळात निर्माण केली. आज अयोध्या नगरीत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शुभहस्ते शिलान्यास विधी संपन्न झाला. खरोखरच आपण सर्वांसाठी आजचा हा दिवस विशेष आहे. ब्रह्मानंद स्वामीजींचे नेतृत्व आम्ही गोमंतकीय कधीच विसरू शकणार नाही, कारण जे क्रांतिकारी कार्य त्यावेळी पूज्य स्वामीजींनी केले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला घ्यायला मिळाला होता. श्रीराम मंदिर शिलान्यासातून ब्रह्मानंद स्वामींची स्वप्न साकार होत आहे, असे उद्‌गार आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.

Editing - Sanjay Ghugretar

संबंधित बातम्या