विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर शेळ मेळावलीत
आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सायंकाळी शेळ मेळावलीत जाणार आहेत.
पणजी: सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सायंकाळी शेळ मेळावलीत जाणार आहेत.
पणजीच्या कॉग्रेस भवनात दुपारी साडेतीन वाजता कॉग्रेसने वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर पोलिस महासंचालकांची भेट घेऊन आंदोलक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस नेते सत्तरीकडे रवाना होणार आहेत. शेळ मेळावलीतील आंदोलकांविरोधात सरकारने बळाचा वापर सुरु ठेवल्यास राज्यभरातील जनता तेथे पोचेल असा इशारा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिला होता.
आणखी वाचा:
गोव्यात पंतप्रधान वन धन योजना; महिलांच्या स्वयंसहाय्य गटांना होणार लाभ -